पोलिसांची तत्परता ; साईभक्त भाविकाला २ लाख ७० हजारांचे दागिने सुपुर्द
सहायक पोलीस निरीक्षक भारत बलैया यांची कामगिरी
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : आंध्रप्रदेश राज्यातील साईभक्त अडबाला वीरा वेंकटा हे पत्नीसहस्य दर्शनासाठी आले होते ३१ ऑगस्ट २०२४ रोजी खाजगी चार चाकी स्विफ्ट कारने ते साईनगर विमानतळावर गेले विमानात बसल्यानंतर २ लाख ७० हजाराचे सोन्याचे दागिने पर्स एटीएम कार्ड हे स्विफ्ट डिझायर गाडीत विसरून गेले हे पती पत्नी याच्या लक्षात आले गाडी नंबर किंवा चालकाची माहिती नव्हती त्यांनी तात्काळ एक सप्टेंबर रोजी परत शिर्डी येथे येऊन शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत घडलेल्या घटनेची माहिती दिली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला याच्या मार्गदर्शनाखाली उपभागीय अधिकारी श्री शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नी भारत बलैया यांच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सदरचे वाहनाचा शोध घेउन चालकाची बारकाईने चौकशी केली असता सदरच्या चालकाने पोलीस पथक बघताच आपल्या वाहनात ही पर्स मिळून आल्याची कबुली दिली चालकाने तात्काळ पोलीसांना माहिती देणे गरजेचे होते मात्र त्याकडे दुर्लक्ष चालकाने केल्याचे पुढे आले शिर्डी पोलिसांनी दोन लाख ७० हजार रुपये सोन्याचे दागिने पर्स व एटीएम ताब्यात घेऊन अवघ्या दोन तासात मूळ मालकाच्या ताब्यात दिले याबद्दल बोलताना साईभक्त अडबाला वेंकटा म्हणाले कि साईबाबाचा आशिर्वाद व शिर्डी पोलिसाची तत्परता यामुळे आमचे सोने व दागिने परत मिळाल्याचे सांगताना या महिलेच्या डोळ्यात आंनद अश्रू आले होते या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रसाद गोरे गणेश घुले यांनी आतिशय सुत्रबध्द केलेल्या तपासा मुळे हे यश मिळाले आहे
Comment List