भयंकर....चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा दगडाने ठेचुन खून ; पतीनेही नंतर घेतला गळफास 

आधुनिक केसरी न्यूज 

रिसोड : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे दिनाक 5 जुलै 2024 रोजी लोणी बुद्रुक येथील मोरदडा शेत शिवारात उषा विलास सुर्वे वय 35 वर्षे या महिलेच्या चारीत्र्यावर संशय घेऊन पतीने फोटी काढण्याच्या बहाण्याने जंगलामध्ये नेऊल दगडाने ठेचुन हत्या केल्या नंतर विलास लिंबाजी सुर्वे वय 40 वर्षे याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची विदारक घटना घडली,घटनास्थळाचा पंचनामा रिसोड पोलिस करीत आहेत.सदर घटनेची तक्रार मृतक महीलेचा भाऊ फिर्यादी अनिल चिमणाजी भोटाणे रा.केसापुर,जिल्हा हिंगोली यांनी दिलेली आहे.
 रिसोड तालुक्यातील लोणी बु.येथिल मोहदरी शेतशिवारा मध्ये एक महिला मृत अवस्थेत पडलेली असल्याची घटना ता.5 जुलै रोज शुक्रवार ला सायंकाळी 6 वाजता दरम्यान समजली असता.लोणी बुद्रुक चे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून रिसोड पोलीस स्टेशन ला सदर घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मृत महिलेची ओळख पटवली असता मृत महिला लोणी बुद्रुक येथील उषा विलास सुर्वे अंदाजे वय वर्षे 35 वर्षे ओळख पटल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय रिसोड येथे पाठविण्यात आला.असुन पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोकराव गीते,हे करीत आहेत.
त्यातच लोणी बुद्रुक येथील मृत महिलेचा पती विलास सुर्वे अंदाजे वय 40 वर्षे याने लोणार तालुक्यातील मढी शेत शिवारात निलगिरीरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान निदर्शनास आली.सदर घटनेची माहिती मढी गावचे पोलीस पाटील प्रभाकर गाडे यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली असता लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याची कारवाई वृत्तलीहेपर्यंत सुरू होती.लोणी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील पत्नीची हत्या तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या झाल्याने लोणी बुद्रुक परिसरात शोक भावना व्यक्त करून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच दोन्ही घटना ह्या रिसोड आणि नजीकच्या लोणार हद्दीत झाल्याने पोलीस तपास रिसोड पोलीस स्टेशनकडे वर्ग होतो काय? हे येणारा काळच ठरविणार असुन दोन्ही घटनामुळे लोणी बुद्रुक येथे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.सदर महिलेची हत्त्या ही चारीत्र्यावर सततच्या संशयाने घडली आसुन सदर घडनेने रिसोड तालुक्यातील लोणी बु.चे ग्रामस्थ हादरून गेले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...