परिवहन मंडळाची शयन यान बस पलटी ; चालकासह प्रवासी जखमी 

परिवहन मंडळाची शयन यान बस पलटी ; चालकासह प्रवासी जखमी 

आधुनिक केसरी न्यूज 

देऊळगाव राजा :परिवहन मंडळाची श्यनयान एस टी बस पलटी झाल्याची घटना जाफराबाद चौफुलीवर घडली.या अपघातात बस चालकसह काही प्रवाशी जखमी झाले, पोलिसांनी हलगर्जीपणाने भरधाव बस चालवून प्रवाशांसह स्वतः जखमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
सदर अपघात झाल्याचे कळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण घटनास्थळी पोहोचले, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले,बस चालक विलास प्रल्हाद हेबाळे रा मंगरुळपिर याने एस टी बस क्र एम एच १४ एल.बी २६०६ ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन सदर बस ही जाफराबाद चौफुली जवळ पलटी झाल्याने बस मधील प्रवासाना व स्वत: जखमी होणेस कारणीभुत झाला. फिर्यादी हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी बस चालक विलास हेबाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास  पोहेका भास्कर सानप करीत आहे. देऊळगाव राजा येथील वळण रस्त्यावरील जाफराबाद चौफुली येथे नेहमीच अपघात घडत असतात, या चौफुलीच्या धोकादायक वळणावर आतापर्यंत अनेकांना जीव गमावावे लागले,तर शेकडो जणांना अपंगत्व पत्करावे लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग या अपघाती चौफुलीवर अपघात घडू नये म्हणून पर्यायी उपाय योजना करण्या च्या दृष्टीने दुर्लक्ष करीत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List