भाऊबीजेच्या दिवशी पाण्यासाठी महिलांचा टाहो..!

भाऊबीजेच्या दिवशी पाण्यासाठी महिलांचा टाहो..!

आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके 

जळगाव जा : तालुक्यातील खांडवी येथे भाऊबिजेच्या दिवशीच वेळेवर पाणी मिळत नसल्याने खांडवी ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी सरपंचाच्या घरासमोर आंदोलन केले.भाऊबीज हा अतीशय महत्वाचा सन.महीलांसाठी या सनाच महत्त्व अनन्यसाधारण.पण याच सनाच्या दिवशी खांडवी गावांमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश पहावयास मिळाला.भर सनाच्या दिवशी कोणाच्याच घरी पाणी नव्हते.वेळेवर पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांचेकडे तक्रार केली होती.घरी पाणीच नाही तर काय करावे हा मोठा प्रश्न महिलांसमोर पडला.भाऊबिजेसारख्या सनाच्या दिवशीही पाण्यासाठी महिला वनवन फिरत असल्याने गावात चांगलंच वातावरण तापलं होतं.अखेर संताप अनावर झाल्याने सर्व महिला व पुरुष वर्ग सरपंच कविता निलेश उमाळे  यांच्या घरासमोर त्यांनी ठिय्या मांडला.जोप्रयंत आमच्या भागात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठत नाही अशी भूमिका महिलांनी घेताच सरपंचांनी नरमाईची भूमिका घेतली. ग्रामसेवक संगिता शेजूळ यांनी सुद्धा पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर लोकांना वाऱ्यावर सोडल्याने  गावकऱ्यांनी त्यांना सुद्धा फोन करून धारेवर  धरले. एवढं करूनही लोकांच्या पदरात निराशाच पडली.पाण्यासाठी लोकांची धडपड व्यर्थ ठरली.त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.जर ग्रामपंचायत मे यासंदर्भात ठोस पाऊल  उचलले नाही तर ग्रामपंचायत प्रशासना विरोधात  मोठे आंदोलन केल्या जाईल

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..! गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे हिवाळी 2024 च्या परीक्षा सुरू आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून सर्वत्र मिरवणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या...
गोंडवाना विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकाला ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भागात स्वातीताईना प्रचंड प्रतिसाद..!
डाॅ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ मोठे बंधू राजुभाऊ कुटे यांचा गावभेटी दौरा..!
जागृती जथ्याच्या माध्यमातून मतदार संघात संजू भाऊचा प्रचार धूम धडाक्यात सूरू
अखेर अभिलाषा गावतुरे यांची हकालपट्टी..!
प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद येथे संभाजी राजे यांची जाहीर सभा