मुनगंटीवार दिल्ली ला रवाना पण..!

मुनगंटीवार दिल्ली ला रवाना पण..!

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : आयारामांना स्थान नको तर पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या या मागणीसाठी चंद्रपूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या आवडत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. तर पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या भावना कळवायला निघाले आहेत.महाराष्ट्राच्या निवडणूक रणसंग्रामामध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागलेले आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाची उमेदवारी मिळणार असे संकेत दिसत असतांनाच सुधीर मुनगंटीवार हे जोरगेवार नकोत म्हणून पेटून उठले आहेत आणि त्यासाठी ते कार्यकर्त्यांची इच्छा, एकनिष्ठ कार्यकर्ता, आयाराम नकोत अशी अनेक कारणं देत आहेत. परंतु 2009 मध्ये किशोर जोरगेवार हे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ता होते , तेव्हा कार्यकर्त्यांचीही इच्छा होती की जोरगेवार यांना उमेदवारी द्यावी, शिवाय सुधीर मुनगंटीवार यांचे उजवे हात म्हणून त्यांना ओळखले जात होते. म्हणून 2009 मध्येच किशोर जोरगेवार यांना भाजपा कडून उमेदवारी मिळावी या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. परंतु त्यावेळेस मात्र नागपूरचे पार्सल असलेले, आयात उमेदवार, कार्यकर्त्यांची इच्छा नसतांना नाना शामकुळे यांना मात्र भाजपने स्वीकारले. त्यावेळेस एकनिष्ठ कार्यकर्ता असलेले जोरगेवार यांच्यावर आज मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार अन्यायच झाला होता. आयाराम असलेल्या नाना शामकुळे यांच्यामुळे दहा वर्षात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ही दोन महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये उभी फूट पाडणारी ठरली आणि भाजपा मध्ये दोन गट निर्माण झाले होते. त्यावेळेस मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांना उमेदवारी द्यावी यासाठी आजच्या सारखे तातडीच्या दिल्ली वारीचे प्रयत्न का केले नाहीत? असे आता चंद्रपूरकरच नव्हे तर भाजपामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणू लागले आहेत. कारण जोरगेवार हे मूळ भाजपाचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. 2009 आणि 2014 मध्ये सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे अखेर त्यांना 2019 ला जनतेनेच ही निवडणूक आपल्या हातात घेत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले होते. विशेष म्हणजे जोरगेवार यांनी तेव्हा भाजपाच्याच नाना शामकुळे यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला होता. 

आज जेव्हा वरिष्ठ पातळीवरून जोरगेवार यांना भाजपामध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत तेव्हा फक्त मुनगंटीवार यांना जोरगेवार का नकोत? हा प्रश्न आता भाजपा परिवारामधील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पडला आहे. मुनगंटीवार यांच्या जोरगेवार विरोधाचे मुख्य कारण म्हणजे 2029 मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली चंद्रपूर विधानसभा हे आरक्षण मुक्त झाल्यास चंद्रपूर विधानसभा मध्ये पुन्हा एकदा आपणच इथले सर्वाधिक जेष्ठ राज्यकर्ते म्हणून समोर यावे आणि पक्षातील आपले सिंहासन कायम राहावे, अढळ राहावे या दृष्टीने ही सगळी खटाटोप मुनगंटीवार करत आहेत. त्यासाठी सध्या भाजपाची ही सीट निवडून आली नाही तरी चालेल परंतु जोरगेवारांना मात्र भाजपा प्रवेश करून येथील उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी मुनगंटीवार आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. महाराष्ट्रातील सत्तेसाठी भाजपा ला आता प्रत्येक सीट महत्त्वाची आहे आणि म्हणूनच निवडून येण्याच्या निकषावर किशोर जोरगेवार हे आज चंद्रपूर विधानसभेमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर आहेत आणि म्हणूनच भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह चंद्रपुरातीलही काही नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना किशोर जोरगेवार  भाजपा चे उमेदवार म्हणून हवे आहेत. 

लोकसभा निवडणुकीत तब्बल 2 लाख 62 हजार मतांनी पराभूत झालेल्या मुनगंटीवार यांनी परत विधानसभा निवडणुकीची तयारी केली असली तरी बल्लारशा हा आपला मतदारसंघ सोडून त्यांना चंद्रपूर मतदारसंघात इतका जास्त रस का ? आणि जोरगेवारांची इतकी भीती का ? 30/35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विविध मंत्रीपद भूषविणारे मुनगंटीवार जोरगेवार यांच्या अवघ्या 5 वर्षाच्या राजकारणाला इतकं सिरियसली का घ्यायला लागले आहेत ? जोरगेवारांची इतकी भीती मुनगंटीवार यांना का वाटावी ? असे प्रश्न आता चौकाचौकात विचारल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार दिल्ली ला रवाना झालेत पण, आता वरिष्ठांना निवडून येणारे जोरगेवार हवे असतील तर हा प्रश्न आता सर्वत्र चांगलाच चर्चिल्या जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड
रिसोड: देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटनेच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची आढावा सभा  आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी व्हॉईस ऑफ मीडिया...
कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात 
CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!