रेल्वेच्या अत्याधुनिक विकासात मोदी सरकारच अभुतपूर्व योगदान : हंसराज अहीर...

रेल्वेच्या अत्याधुनिक विकासात मोदी सरकारच अभुतपूर्व योगदान : हंसराज अहीर...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : देशाच्या आर्थिक विकासात रेल्वेचे अनन्यसाधारण असलेले महत्व व राष्ट्रीय एकतेचे प्रतिक असलेल्या रेल्वेच्या विकासाला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीपासून मोठी चालना मिळाली असून जगातील चौथा क्रमांकाचा नेटवर्क असलेला देश म्हणून भारताचा लौकीक आहे नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत गाडीचे हिरवी झेंडी दाखवून स्वागत करतांना विशेष आनंद होतोच परंतु वदेभारत मुळे प्रवास्यांच्या व इथे उपस्थित शेकडो लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुध्दा अभुतपूर्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह

राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चंद्रपूर रेल्वे स्थानक येथे दि १६ सप्टेंबर २०२४ रोजी बंदेभारत एक्सप्रेसच्यास्वागतासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, भाजप नेते विजय राऊत, चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण, दामोधर मंत्री, रेल्वेचे वरिष्ठ अधिकरी विवेक खोके, अभिषेक गुप्ता, किरण नागपुरे, एस. एल. मानवटकर, श्री. प्रसाद, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, इजि. रमेश राजुरकर, डॉ. मंगेश गुलवाडे, रघूवीर अहीर, सुभाष कासनगोटुवार, राजु घरोटे व भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना अहीर यांनी मा. नरेंद्र मोदी जी यांची दूरदृष्टी, विकासाप्रती असलेले समर्पण व नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध् यमातून गेल्या १० वर्षात देशातील रेल्वेचा अतुलनीय, अभुतपूर्व व अद्ययावत सोईसुविधासह विकास झाला असल्याचे सांगितले देशभरात शंभर वंदेभारत सुरू होत आहे काश्मीरात साधे रूळाचे काम करणे कठीण होते तिथे चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधून प्रधानमंत्र्यानी आपल्या इच्छाशक्तीचा प्रत्यय दिला हजारो किमी नॅरोगेजचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन केले. भारतीय रेल्वेला नवा आयाम प्राप्त करून देण्यात मोदी सरकारचे मोठे योगदान असल्याचेही त्यानी सांगितले

आज एकाच दिवशी ६ वदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून सरकारच्या विकासाचा वेगवान झंझावाताची साक्ष दिली आहे. चंद्रपूर स्थानकात या एक्सप्रेसच्या थांब्याची विनंती मान्य करण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री व रेल्वेमंत्र्यांचे विशेष आभार मानले चंद्रपूर रेल्वे स्थानकाला अमृत स्थानकाची मान्यता आहे. येत्या नजीकच्या काळात या स्थानकास चांदा फोर्ट जोडला जाणार आहे व प्रवास्यांच्या सोईसुविधांसाठी वचनबध्द राहू असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले वंदेभारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व अन्य क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...