राज्यातील शिक्षकांना मिळणार आता हक्काचे दस्तऐवज ; भाजप शिक्षक आघाडीचे यश ; शिक्षण संचालकांचे तडकाफडकी आदेश

राज्यातील शिक्षकांना मिळणार आता हक्काचे दस्तऐवज ; भाजप शिक्षक आघाडीचे यश ; शिक्षण संचालकांचे तडकाफडकी आदेश

आधुनिक केसरी न्यूज 

ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर : महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ नियम ९, ११ व १२ तसेच शिक्षण सेवक शासन निर्णय १३/१०/२००० अन्वये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेची संबंधित दस्तऐवज मिळण्याचा अधिकार आहे पण अद्यापही या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेत अनिल महादेवराव शिवणकर, अध्यक्ष, नागपूर विभाग,भाजप शिक्षक आघाडी यांनी मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  पुणे यांना वरील बाब निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली यावर मा.महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी तडकाफडकी राज्यातील सर्व सर्व शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाच्या अनुषंगाने शिक्षकांना त्यांची हक्काची दस्तऐवज मिळवून देण्याचे आदेश दिले.
अनेक खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज अजूनही संस्था व मुख्याध्यापकांमार्फत दिल्या जात नाही. जसे...प्रथम नियुक्ती आदेश प्रत (१९८१ नियम ९(५) अनुसूची ड),नियुक्ती आदेश जोडपत्र  (ब) (१३/१०/२००० शिक्षकेत्तर व शिक्षण सेवक) , प्रथम मान्यता आदेश प्रत. (परिविक्षाधीन कालावधी शिक्षण सेवक, शिक्षकेत्तर
 सेवक) ,सेवा सातत्य आदेश प्रत, दुय्यम सेवा पुस्तक ,वेतन प्रमाणपत्र, वरिष्ठ , निवड श्रेणी मान्यता आदेश प्रत, पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र प्रत.,भविष्य निर्वाह निधी परतावा ना परतावा आदेशाची प्रत, नॉमिनेशन आदेश प्रत अशाप्रकारे वरील सर्व आदेशांची एक प्रत संस्था व मुख्याध्यापकांमार्फत कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असूनही अनेक कर्मचाऱ्यांकडे वरील दस्तऐवज अद्यापही दिल्या गेलेली नाही, ही बाब शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असून त्यांच्या सेवेसी संबंधित हक्काच्या दस्तऐवजापासून त्यांना वंचित ठेवणारी आहे असा युक्तिवाद निवेदनाद्वारे अनिल शिवणकर यांनी केला त्यावर मा. महेश पालकर, शिक्षण संचालक यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी वरील दस्तऐवज शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळून देण्यासाठी तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश  दिले. *राज्यातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेशी संबंधित हक्काची सर्व दस्तऐवज मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांना लेखी अर्ज करावा व दस्तऐवज न दिल्यास शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला लेखी तक्रार करावी असे आवाहन अनिल शिवणकर यांनी राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांना केले. प्रसंगी अनिल शिवणकर ,सुधीर अनवाणे ,नरेश कामडे ,हरीश केवटे , अशोक हजारे जिल्हा संयोजक , प्रदीप बिबटे शहर संयोजक, मोहन भेलकर, मोनिका वारोटकर, मोहनिष राऊत,ओंकार श्रीखंडे,विशाल चव्हाण,श्रीवंत शेंडेबंडू कुबडे,कविता वारोकर
विपुल राऊत,छाया मेहेत्रेविनोद ढोबळे ,प्रशांत राऊत, ज्ञानेश्वर उमरे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...