स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले रोहित्र

रोहित्र नसल्यामुळे शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले रोहित्र

 

आधुनिक केसरी न्यूज 

ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर: बऱ्याच दिवसापासून लव्हाळा येथील शेतकऱ्यांचे जनुभाऊ डीपी रोहित्र ओव्हरलोड मुळे वारंवार जळत होते विद्युत प्रशासन त्यावर कुठली खबरदारी घेत नव्हते सदर रोहित्र मागणीसाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले व तालुकाध्यक्ष गणेश गारोळे यांच्याकडे तक्रार केली की सदर रोहिञ जळाल्यामुळे आमच्या शेती पिकाचे वारंवार खुप  नुकसान होत असून आम्ही सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीने आम्हाला रोहीञ मिळावे असी मागणी केली त्यानंतर लगेचच त्याची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी हा प्रश्न लावून धरला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला व निवेदन दिले आणि शेतकऱ्यांना तात्काळ ६३ के व्ही चे रोहिञ हे १०० के.व्हि.चे करून तात्काळ बदलून देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डाॕ. ज्ञानेश्वर टाले तालुका अध्यक्ष गणेश गारोळे तालुका अध्यक्ष युवा आघाडी देवेंद्र आखाडे पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास उतपुरे विधानसभा अध्यक्ष गोपाल सुरडकर तालुका उपाध्यक्ष संदीप नालींदे अरविंद दांदडे मेहकर शहराध्यक्ष जुबेर भाई डोणगाव शहराध्यक्ष वैभव आखाडे अपंग आघाडीचे महेश देशमुख ज्ञानेश्वर दांदडे साजन शहा सलीम शहा यावेळी हजर होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List