![चितेवर झोपून भोकरला अनोखे उपोषण ; हाकेंच्या ओबीसी उपोषणास पाठिंबा](https://www.adhunikkesari.com/media-webp/c200x160/2024-06/img-20240620-wa1284.jpg)
वाकद ग्रामस्थांचा हक्कासाठी रास्ता रोको ; गावातील समस्यांमुळे हैराण, आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग
On
आधुनिक केसरी न्यूज
विनोद पाटील बोडखे
रिसोड : तालुक्यातील वाकद ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थांना गावात मूलभूत सुविधा पुरवित नसून गावामधे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. जसे घरकुल, नरेगा अंतर्गत लाभ मिळत असलेल्या सिंचन विहीर यासह विविध शासकीय लाभांच्या योजनांची प्रकरणेही अडकवून ठेवल्याचा आरोप करीत याकडे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी 26 जून रोजी वाकद बसथांब्यावर सकाळी 10 ते 12 या वेळेत रास्ता रोको आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले.पावसाळ्याचे दिवस असतानाही वाकद ग्रामपंचायतीने गावात स्वच्छतेची कामे केली नाहीत, जलजीवन मिशनच्या काम अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना भर पावसाळ्यातही डोईवरचा पाण्याचा हंडा कायम आहे.दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याशिवाय घरकुल, सिंचन विहिरींच्या फाईल देखील अडवून ठेवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या गंभीर बाबीकडे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकरी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंचासह आठ सदस्यांनी बुधवारी सकाळी वाकद ते मेहकर रस्त्यावर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही गावकऱ्यांनी केला. दरम्यान, पंचायत समितीच्या चमूने आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावर पारित झालेले ठराव पंचायत समितीकडे पाठवा, त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात योग्य तो तोडगा काढण्यात येईल.वाकद गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम त्वरित सुरू करून गावकऱ्यांना पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी महिलांनी सुद्धा हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता.पंचायत समिती चमूने सर्वच समस्यांवर योग्य उपाय योजना करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.रास्ता रोको आंदोलनात वंचित बहुजनआघाडीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत उपसरपंचासह 8 सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या वेळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
![](https://www.adhunikkesari.com/media-webp/2022-07/mahaveer-new.jpg)
![Adhunik Kesari Subscribe](https://www.adhunikkesari.com/media-webp/2024-04/adhunik-ad.jpeg)
Latest News
30 Jun 2024 17:13:19
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली....
Comment List