विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतला कंधार-लोहा विधानसभेचा आढावा ; आगामी निवडणुकीसाठी सतर्क राहण्याचा दिला कानमंत्र..!

विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतला कंधार-लोहा विधानसभेचा आढावा ; आगामी निवडणुकीसाठी सतर्क राहण्याचा दिला कानमंत्र..!

आधुनिक केसरी न्यूज

धोंडीबा मुंडे
   
      कंधार: अपेक्षेप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष कंधार-लोहा विधानसभेवर आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी दावा करत आहे.याच अनुषंगाने शिवसेनेचे कंधार लोहा विधानसभा संपर्कप्रमुख.आशिष आसगावकर यांनी दि.१५जुन रोजी कंधार येथे शिवसेनेच्या सिंहगड जनसंपर्क कार्यालय कंधार. येथे शिवसैनिकाची बैठक घेऊन,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली.
       लातूर लोकसभा मतदार संघात कंधार-लोहा विधानसभेचा समावेश करण्यात आलेला असून.लातूर लोकसभेला महाविकास आघाडीचे डॉ.शिवाजी काळगे हे मताधिक्याने निवडून आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले आहे.आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख आशिष आसगावकर कंधार येथे शिवसैनिकांसोबत चर्चा करून,निवडणुकीच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली.तालुक्यातील सर्व उप-तालुकाप्रमुख,सर्कल प्रमुख, गणप्रमुख, बूथ प्रमुख यांच्या नेमणुका झाल्यात की नाही. यांचा तपशील घेतला. विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत, असल्यास त्यांचा जनसंपर्क कसा आहे,गाव तिथे शिवसेना आणि शाखाप्रमुख नियुक्त झाले आहेत का.अशा विविध  मुद्द्यावर शिवसैनिकासोबत चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी शिवसैनिकांनी प्रत्येक विषयावर आपले मत मांडून. लेखी अहवाल विधानसभा संपर्कप्रमुख आशिष गावकर यांच्याकडे सादर केला.
      यावेळी विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव,माजी सभापती तालुका संघटक पंडित देवकांबळे,पंचायत समिती सदस्य तालुका समन्वयक उत्तम चव्हाण,किसान सेना तालुकाप्रमुख शिवाजी कदम,उपतालुकाप्रमुख दादाराव शिंदे, जेष्ठ शिवसैनिक आत्माराम पाटील लाडेकर,शिवदूत नामदेव गांगतिरे, युवासेनेचे निरंजन वाघमारे, राहुल शिंदे,संतोष पाटील घोरबांड, सर्कल प्रमूख रोहीदास शिरढोने, रमाकांत देवणे, अच्युत मेटकर,जीएम पवळे,जळबा पाटील शिंदे, केदारनाथ देवकांबळे, निरंजन वाघमारे, बाबु पाटिल शिंदे,लक्ष्मण कटवाड,याबरोबर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List