नीट २०२४ निकालात महाराष्ट्रात आयआयबीच अव्वल ...!

१०० टक्के ओरिजनल निकालामुळे विद्यार्थी पालकांना आयआयबीचा विश्वास…!

नीट २०२४ निकालात महाराष्ट्रात आयआयबीच अव्वल ...!

आधुनिक केसरी न्यूज 

लातूर /  नांदेड  : लातूरच्या शैक्षणीक क्षेत्रात गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण करून त्याचा दबदबा संपूर्ण राज्यात केलेल्या व 
महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळख निर्माण केलेल्या  आयआयबीने ४ जून रोजी जाहीर झालेल्या नीट २०२४ च्या निकालात ऐतिहासिक कामगिरी करत गुणवत्तेचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या वर्षीच्या निकालात आय आय बी इन्स्टिट्यूटचा सिंद्धात राख याने ७१० गुण मिळवत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहे तर यासोबतच आयआयबी च्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आय आय बी ने आपली गुणवत्ता सिद्ध करत नवा गुणवत्तेचा बेंचमार्क सेट केला आहे.
     आयआयबीच्या ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत ऋुषीकेश गायकवाड ७०५ , ओम येसने ७०५ , कु.प्राजक्ता भगत ७०० , महेश सत्यधर ७०० , कु.सानिया मिरजे ७०० या विद्यार्यांनी बाजी मारली असून याशिवाय  इन्टिट्यूटच्या तब्बल २२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी ६५० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत यासह फिजिक्स , केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत निकालावरून नीट २०२४ च्या निकालात महाराष्ट्रासह देशात गुणवत्तेचा अमीट ठसा आयआयबी इन्स्टिट्यूटने उमटविला आहे . या कामगिरीच्या बळावर याही वर्षी आयआयबी हे महाराष्ट्रातून एमबीबीएसला सर्वाधिक विद्यार्थी पाठविणारे इन्टिट्यूट ठरणार आहे. सलग २५ वर्षापासून "आयआयबी आहे तर विश्वास आहे" हे वाक्य केवळ बिरुद नाही तर या निकालाने ते सिद्ध देखील झाले आहे. त्यामुळे आय आय बी संधर्भात गुणवत्तेचा ओरिजनल विश्‍वास हे समीकरण आणखी बळकट होत आहे. दरवर्षी मे महिन्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए कडून या परिक्षेचे आयोजन केले जाते. 
-------------------------------------
यावर्षीही ५ मे रोजी देशभरात ही परीक्षा पार पडली आहे.नीटचा निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यात सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.तसेच ६५० पेक्षा अधिक गुण घेणारे २२५ पेक्षा जास्त विद्यार्थी असून यावर्षीही आयआयबी च्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश मिळेल असे संचालक दशरथ पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देतांना सांगितले.
----------------------------

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड
रिसोड: देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटनेच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची आढावा सभा  आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी व्हॉईस ऑफ मीडिया...
कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात 
CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!