आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त रिल्स स्पर्धा !शॉर्ट फिल्मलाही संधी; डॉ. अमोल कोल्हे च्या हस्ते बक्षिस वितरण

आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त रिल्स स्पर्धा !शॉर्ट फिल्मलाही संधी; डॉ. अमोल कोल्हे च्या हस्ते बक्षिस वितरण

आधुनिक केसरी न्यूज

श्रीकांत चौरे,

पारनेर : येत्या १० मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या पारनेर - नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त रिल्स स्पर्धा तसेच आ. नीलेश लंके यांच्या जीवन चरित्रावर आधारीत शॉर्ट फिल्म ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना हजारो रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. 
हजारो रूपयांची बक्षिसे...
      या स्पर्धेत उत्कृष्ठ रिल्स व शॉर्टफिल्म सादर करणा-या स्पर्धकास ५१ हजार ३३३  रूपयांचे प्रथम, ३३ हजार ३३३ रूपयांचे व्दितीय, २१ हजार ३३३ रूपयांचे तृतीय तर ११ हजार ३३३ रूपयांचे चतुर्थ पारितोषीक व सन्मानचिन्ह देउन सन्मानीत करण्यात येणार आहे. याशिवाय  ३  हजार ३३३ रूपयांची प्रत्येकी पाच उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार असल्याचे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने सांगण्यात  आले.
     या स्पर्धेसंदर्भातील अधिक माहीती किंवा काही अडचण असल्यास मनोज शिंदे,९८३४८७८७४२, जितेश सरडे, ९१५८६८२८६६ ,सुदेश आबूज ९५११७२७९३६ किंवा श्रीलेश मेसे ९५६५००१९१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहेत स्पर्धेचे नियम ?

रिल्स किंवा शॉर्ट फिल्म ही आमदार नीलेश लंके यांच्या जीवनावर आधारीत असावी किंवा त्यांच्यासमवेत घडलेल्या प्रसंगावर अधारीत असावी. रिल्स व्हिडीओ ३० सेकंद ते जास्तीत जास्त १ मिनिटाचा असावा. रिल्स तयार  करताना सोलो किंवा ग्रुप घेउनही करता येईल. आपले रिल्स, शॉर्ट फिल्म दि. २ मार्च पर्यंत पाठविता येतील. मोबाईल किंवा कॅमेरॅने रिल्स शुट करता येतील.  तयार करण्यात आलेेले रिल्स, शॉर्ट फिल्म आपल्या इन्स्टा आयडी, फेसबुक पेजवर अपलोड करून ९८३४८७८७४२ या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर लिंक शेअर करावी.  रिल्स, शॉर्ट फिल्म ९८३४८७८७४२ या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर डॉक्युमेंटने शेअर करावी. 

खा. डॉ. कोल्हे, आ. लंके यांच्या हस्ते बक्षिस वितरण

स्पर्धेचा निकाल एमएलएनीलेशलंके या इंस्टा आयडीवर तसेच नीलेश लंके या फेसबुक पेजवर दि. ३मार्च रोजी जाही करण्यात येईल. विजेत्यांना खा. डॉ. अमोल कोल्हे व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते बक्षिस तसेच सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड विनोद पाटील बोडखे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी फेर निवड
रिसोड: देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटनेच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची आढावा सभा  आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी व्हॉईस ऑफ मीडिया...
कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात 
CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
माजी मुख्यमंत्री कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे.
काँग्रेस कार्यालयावर भाजपचा भ्याड हल्ला, बहुमताच्या जोरावर ही मस्ती चालणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
मनोज जरांगेची नव्या वर्षात मोठी घोषणा, वाचा सविस्तर..!