बी.एन.एन.महाविद्यालयात एस. चंद्रशेखर तारांगणाचे कामनकर दुर्राज यांच्या हस्ते उद्घाटन.
आधुनिक केसरी न्यूज
भिवंडी : दि. 29. नोव्हेंबर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयात आज एस. चंद्रशेखर तारांगणाचे उद्घाटन के के अँड असोसिएटचे कामनकर दुर्राज शमीम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष डाॅ. विजय जाधव. कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, सरचिटणीस आर एन पिंजारी, के के अँड असोसिएटचे झियादभाइ मोमिन, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या महेक पठाण, उपप्राचार्य डाॅ.सुधिर निकम, डाॅ. सुरेश भदरगे, डाॅ. निनाद जाधव, प्रबंधक नरेश सिरसाळे, जेष्ठ पत्रकार जगदीशकुमार पाठारे, डी. एल. अहिरे, अशोक हिवरे, जी. आर पाटील आदिंची उपस्थिती होती.
या तारांगणामध्ये बसून आपल्याला अवकाशाचे लाइव्ह दर्शन करता येणार आहे. यामध्ये चंद्र-सुर्य, तारे व ग्रहांची लाईव्ह हालचाल पाहता येणार आहे. या तारांगणात गेल्यावर अवकाशात सफर केल्यासारखा भास होतो. या प्रकल्पाचा लाभ शालेय व संशोधक विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे अभ्यास करण्यासाठी होणार आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत बी. एन. एन. महाविद्यालयाने अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाॅ. अशाेक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिलीप काकविपुरे, डाॅ. रवी मनोहर यांच्यासह आजी माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.हा प्रकल्प सर्वांना पाहण्यासाठी उद्यापासून खुले करण्यात येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला भेट द्यावेत असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comment List