सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण

सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण

आधुनिक केसरी न्यूज 

बाळासाहेब भोसले

.सिदखेडराजा : तालुक्यातील दुसर बीड येथील प्रदीप उर्फ बाळू पंढरीनाथ घुगे या सैनिकाची 25 नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान सीमा सुरक्षा बलाच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन होऊन निर्मल आल्याची दुर्दैवी घटना घडली सन 2006 मध्ये बीएसएफ १२२ बटालियन भरतीत प्रदीप जनरल ड्युटी जी डी मध्ये शिपाई पदावर भरती झाला होतात्याची आतापर्यंतची हवालदार पदावर सेवेत 18 वर्षे पूर्ण केली होती व दोन वर्षानंतर तो सेवानिवृत्त होणार होता जुलै 2024 च्या 31 तारखेला तो सुट्टीवर घरी दुसरबीड  येथे आला  होता त्याला45 दिवसाच्या सुट्टीमध्ये कुटुंब नातेवाईक सके सोयरे मित्रमंडळी आधीच्या भेटी घेऊन 19 सप्टेंबरला आगडतळा येथे कर्तव्यावर हजर झाला होता सध्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथील बांगलादेशच्या सीमेवर कार्यरत होता काल कर्तव्य बजावत असताना रात्री बारा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्याला वीर मरण आले त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील दोन भाऊ एक बहीण बराच मोठा आप्तपरिवार आहे प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचा मृतदेह आगरताळा येथून कोलकत्ता इंदोर मार्गे 28 नोव्हेंबर गुरुवारी रोजी दुसरबीड येथे पोहोचणार असल्याची माहिती मृतक वीर जवान प्रदीप चे मामा माजी सैनिक अशोक वाघ यांनी दिली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा 'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
आधुनिक केसरी पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड...
मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू
काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 
पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर  गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी