लाडक्या बहीनीसह दाजीला बॅक खात्यात कधी पैसे पडणार याची चिंता
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी कमाल केली आणि मतदानाचा टक्का देखील वाढला व त्यामुळे महायुतीला मोठा विजय मिळवून हे सरकार सत्तेत आले हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या काळात महायुतीने सत्तेमध्ये आलो तर पंधराशे रूपयात वाढ करून २१०० रुपये दिले जातील असे आश्वासन दिले होते त्यामुळे या बहीणी व दाजीनी देखील भरभरून मतदान केले परतु आता आमच्या खात्यात कधी पैसे जमा होणार याची प्रतीक्षा आता या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा लाख पन्नास हजार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना लागली आहे
आत्तापर्यंत पाच हप्ते देखील जमा झालेले आहेत तर काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळाले नसले तरी ज्यांनी तांत्रिक अडचणीची पूर्तता केली त्यांना देखील पैसे मिळाले आहे नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने तात्कालीन सरकारने ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे देखील दिवाळीमध्ये जमा केले होते काहींना तर एकाच वेळी साडेसात हजार रुपये खात्यावर जमा देखील झाली होती आता निवडणुका देखील संपलेले आहेत मग आता आमच्या खात्यात सरकार पंधराशे रुपये पाठवणार की दिलेल्या शब्दाप्रमाणे २१०० रुपये टाकणार याकडे या बहिणींची लक्ष लागले आहे आता या बहिणींना आपला सहावा हप्ता कधी जमा होणार याचीच प्रतीक्षा लागलेली आहे तशीच चर्चा देखील महिला वर्गात सुरू आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी मिळते उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागते मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होतो यात कोणाला कोणते मंत्रिपदे मिळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मात्र आपल्या खात्यात पंधराशे रुपये पडतात की वाढीव दिलेल्या आश्वासन प्रमाणे २१०० रुपये पडतात याकडेच लक्ष लागल्याची दिसून येत असल्याची दिसत आहे
Comment List