मोठी स्वप्ने बघणारानी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत : सारंग नितीन गडकरी

संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पालकांनी हिंदू धर्माची खरी शिकवण मुलाना द्यावी :पार्थ बावसकर

मोठी स्वप्ने बघणारानी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत : सारंग नितीन गडकरी

 

 

IMG-20241126-WA1016

आधुनिक केसरी न्यूज 

संजय व्यापारी

छत्रपती संभाजीनगर : कण्व ब्राह्मण समाजाचे दीपावली स्नेह्मिलन नागपूर येथील  उद्योजक  *श्री सारंग नितीन गडकरी व इतिहास संशोधक पार्थ बावस्कर* यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष सीएस लक्ष्मीकांत जयपूरकर  यांनी समाजाला एकत्र करणे व दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कण्व पतसंस्थेची दुसरी शाखा समर्थनगर येथे उघडण्यात आल्याचे सांगून या पतसंस्थेबरोबरच संस्थेच्या मंगल कार्यालय, अभ्यासिका, कण्व क्लिनिक, आरोग्य शिबिरे, दि 12 जानेवारीला आयोजीत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचा   लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी सारंग नितीन गडकरी यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमाचे कौतुक करून आपल्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजक किंवा व्यावसायिक व्हावे. उद्योजक होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी व जीज्ञ|सुवृत्ती आपल्यात असावी यासाठी त्यांनी स्वतः 4 भागीदारीत सुरू केलेल्या पहिल्या उद्योगाचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून 10% वेळ समाजासाठी देण्याचे आवाहन केले.

इतिहास संशोधक श्री पार्थ बावस्कर यांनी "हिंदुत्व म्हणजे नेमके काय ?" यावर बोलताना सध्याच्या बदललेल्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत हिंदुत्व जपण्याचे आवाहन केले. आज राम, कृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मुलांना  शिकवण्याची गरज असल्याचे सांगून पालकांनी जागरूक होण्याचे आवाहन केले. सध्या गैरसमजुतीमुळे विविध  समाजात अविश्वास निर्माण झाला असून अशावेळी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचार आत्मसात करण्याचा सल्ला दिला. पालकांनी आपल्या मुलांना संस्कृती व विविध देवतांबद्दलच्या गोष्टी सांगून मुलामुलींना समृद्ध वारशाची जाणीव करून द्यावी असे सांगितले. ब्राह्मणातील बुध्धिमत्ता हेरून ब्राह्मणांना नोकरी करण्याची सवय ब्रिटिशांनी लावली. मात्र आता ब्राह्मणांनी नोकरी करणारा ऐवजी नोकरी देणारे होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा उद्योगकेंद्राचे निवृत्त महाव्यपस्थापक पुरुषोत्तम भाले यांना "कण्व जीवन गौरव", उद्योजक वालमी प्रॉडक्टसचे श्री धनंजय व्यंकटराव बडवे यांना उद्योगरत्न, राष्ट्रीय स्तरावरील कराटे चॅम्पियन सोहम राजेंद्र देशपांडे यास खेलरत्न व वेदमूर्ती सचिन सुरेशराव जोशी यांचा "कण्व भूषण" देऊन गौरव करण्यात आला. सन्मानमूर्तींना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सन्मान्पत्राचे वाचन कार्यक्रम प्रमुख उदय मानवतकर यांनी केले.

 तसेच यावेळी समाजाचे मुखपत्र "कण्व विकास" च्या दिवाळी अंकांचे विमोचनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विजयालक्ष्मी भाले- कुलकर्णी व तुळशीदास जयपूरकर यांनी केले तर सचिव धीरज देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष अशोक भाले, कोषाध्यक्ष धनंजय सिमन्त, जनसंपर्क प्रमुख प्रफुल्ल कुलकर्णी, सौ संगीता कागबट्टे, सौ अलका भाले, सुरेंद्र आनंदगावकर, प्रवीण शिरोडकर, महेंद्र मानवतकर, भालचंद्र पिंपळवाडकर, अविनाश आडसकर, सौ ज्योती कुलकर्णी, सौ सविता आचार्य, सचिन दैठणकर व अनिल दिन्नापुरकर यांनी प्रयत्न केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण
आधुनिक केसरी न्यूज  बाळासाहेब भोसले .सिदखेडराजा : तालुक्यातील दुसर बीड येथील प्रदीप उर्फ बाळू पंढरीनाथ घुगे या सैनिकाची 25 नोव्हेंबर...
नव्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसचा खोचक टोला.... मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा ...
मोठी स्वप्ने बघणारानी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत : सारंग नितीन गडकरी
आपेगावी भाविकांनी अनुभवली अध्यात्म आणि वास्तुशास्त्राची अनुभुती ; पहील्याच दिवशी झाले माऊलींच्या मुखावर सुर्य दर्शन 
दणदणीत विजयानंतर मुंबईत पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार
पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक..!
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..!