आपेगावी भाविकांनी अनुभवली अध्यात्म आणि वास्तुशास्त्राची अनुभुती ; पहील्याच दिवशी झाले माऊलींच्या मुखावर सुर्य दर्शन
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : दि,२६ मंगळवार आज सुर्य कीरणोत्सवा निमित्त श्रीक्षेत्र आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमीत संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखावर कार्तिकी एकादशीच्या शुभ पर्वावर मंगळवारी दुपारी १२ वाजुन ५२ मिनिटाने सुर्ये दर्शन झाले.
किरणोत्सवाचा आज पहिला दिवस असल्याने सुर्याची किरणे काही प्रमाणात आल्यावर भाविकांनी माऊलीच्या नावाचा जयघोष केला.
दरम्यान उद्या बुधवार,तसेच संत ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रसंगी गुरुवारी दुपारी १२ वाजुन ५२ मिनिटाने माऊलींच्या मुखावर संपूर्ण सुर्ये दर्शन होणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.
आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज येथील माऊलींच्या जन्मभुमी असलेल्या मंंदिरातील मुर्तीवर गेल्या तीन वर्षापासून समाधी सोहळ्यात किरणोत्सव,सुर्य दर्शन होत असल्याने हा वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचा सुंदर अविष्काराची अनुभुती पाहण्यासाठी भाविक आपेगावात दाखल होत आहेत.
Comment List