अफलातून कारनामा केल्याप्रकरणी वंचितचे युवा महासचिव प्रकाश भिसे पदमुक्त

अफलातून कारनामा केल्याप्रकरणी वंचितचे युवा महासचिव प्रकाश भिसे पदमुक्त

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

 जळगाव जा :- अल्पवधीतच प्रसिद्धी मिळावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जवळ जाण्याची संधी मिळावी,या हव्यासापोटी स्वतःवरच गोळीबाराचे अफलातून कारनामा करणारे वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांना वंचित युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पदमुक्त केले आहे.
      याअगोदर भिसे भाजपात कार्यरत असताना अशाच एका कथित  प्रकरणी त्यांना पक्षाने निष्काशीत केले होते. हे येथे उल्लेखनीय आहे. गेल्या २५ जून  रोजी आपल्याच गाडीवर गोळीबार झाल्याचे बनावट नाटक त्यांनी केले होते. परंतु पोलिसांनी तपासा अंती हे निष्पन्न केले की गोळीबार झालाच नसून भिसे यांनी ती गोळी स्वतःच्या हाताने काचेमध्ये अडकवली व प्रसिद्धीसाठी हे अफलातून नाटक केले. त्यामुळे ९सप्टेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. प्रकाश भिसेवर गोळीबार झालाच नाही, तर ही बंदुकीची गोळी त्यांच्याजवळ आली कशी? हा  संशोधनाचा विषय आहे.
ह्या घटनेमुळे पक्षाची एकंदरीत बदनामी झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी एका पत्रकाद्वारे १५ सप्टेंबर रोजी भिशे यांना पदमुक्त केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...