'हे पत्र दातृत्वाची प्रचिती देणारे...' राजर्षी शाहू महाराजांना जयंत पाटील यांचे आगळेवेगळे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना लिहिले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले

'हे पत्र दातृत्वाची प्रचिती देणारे...' राजर्षी शाहू महाराजांना जयंत पाटील यांचे आगळेवेगळे अभिवादन

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाहू महाराजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना लिहिले पत्र पोस्ट केले. छ्त्रपती शाहू महाराज यांच्या दातृत्वाची प्रचिती देणारे हे पत्र आहे असेही त्यांनी म्हटलंय. 

काय आहे पत्रात ? 

हे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१ साली लंडनहून लिहिले आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यात किती घनिष्ट संबंध होते याची प्रचिती या पत्रातून आपल्याला येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पत्रात त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत शाहू महाराजांना सांगत आहेत. तसेच ही आर्थिक अडचण दूर करण्याची विनंती शाहू महाराज यांना करत आहेत. 

 

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List