'विकसित मराठवाडा २०४७' विषयावर होणार बुधवारी विचार मंथन

मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) व एमईडीसी (महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे पहिला उपक्रम

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) व एमईडीसी (महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने "विकसित मराठवाडा २०४७" या एक दिवसीय चर्चासत्राचे मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), बीड बायपास रोड, छत्रपती संभाजी नगर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. 

पुढील काही वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर नेण्याचा संकल्प आहे, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वाटा 1 ट्रिलियन डॉलर (20%) करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मराठवाड्याचे महत्त्व ओळखून मित्र आणि एमईडीसी यांनी ह्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. याकरिता मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) नॉलेज पार्टनर असणार आहे. या परिसंवादामध्ये उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, विषय तज्ञ, संशोधक, अर्थशास्त्रज्ञ, शासकीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरणे शोधणे हा या चर्चासत्राचा उद्देश आहे. मराठवाड्यातील आर्थिक वाढ आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, वॉटर ग्रीड, कृषी या विषयांवर उहापोह करणार आहे, तसेच या विषयांमधील संधी आणि आणि त्यावर कृतीयोग्य उपाय सुचवतील. 

चर्चासत्राची उद्दिष्ट्ये :
- धोरणात्मक गुंतवणूक आणि औद्योगिक विकास.
- जलस्रोत व्यवस्थापन आणि वितरण सुधारणे.
- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे.
- विभागाची पर्यटन क्षमता वाढवणे.
- पायाभूत आयटी सुविधा आणि क्षमतांचा विस्तार करणे व नाविन्यपूर्ण आणि कौशल्य विकासाला चालना देणे.
- सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि सर्वसमावेशक धोरणांद्वारे सर्वांगीण आणि शाश्वत प्रादेशिक विकासाला चालना देणे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List