वडांगळी यात्रेत उघडयावरील पशुबळी विरोधात अंनिसचे प्रबोधन

वडांगळी यात्रेत उघडयावरील पशुबळी विरोधात अंनिसचे प्रबोधन

आधुनिक केसरी न्यूज

निफाड :-  नवसापोटी उघड्यावरील दिल्या जाणाऱ्या पशुबळी विरोधात महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व सिन्नर शाखेच्या वतीने आज वडांगळी  येथे भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. प्रबोधन कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी जत्रेच्या परिसरात फेरफटका मारून उघड्यावर पशुबळी  होतात किंवा कसे, तसेच इतर अनिष्ट ,अघोरी प्रथांचे अवलोकन केले. 
   कत्तलखान्यात पशुबळी देणाऱ्या इसमाकडे  चौकशी केली असता एकूणच उड्यावरील पशुबळी देण्यात आणि नवस करण्याच्या प्रमाणातही घट झाल्याचे समजले. पोलिसांनीही याला दुजोरा दिला. प्रत्यक्षात तसे दिसत होते. यवतमाळ बीड, वाशिम, गुलबर्गा इथून आलेल्या काही भाविकांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की, ऐपत नसतानाही अनेक भाविक कर्जाऊ रक्कम घेऊन नवसपूर्तीसाठी आलेले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मंदिराच्या प्रांगणातच  प्रबोधनाचा फलक लावून विशेषतः तरुण भाविकांचे आणि महिलांचे नवसापोटी पशुबळी देण्याच्या अनिष्ट व अघोरी प्रथेविरोधात प्रभावी प्रबोधन केले. नवस करू नये, असे  संतांनी निक्षून सांगितलेले आहे, आणि उघड्यावर पशूबळी देऊ नयेत असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे आपण पालन करावे असे सांगून कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की, पशुबळीसाठी  येणारा खर्च हा कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण व इतर आवश्यक गरजांसाठी करावा. या प्रबोधन प्रबोधन मोहिमेत अंनिसचे राज्य प्रधान सचिव  डॉ.टी.आर.गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शामसुंदर झळके, कायदेशीर सल्लागार ॲड समीर शिंदे, अरुण घोडेराव, कॉम्रेड हरिभाऊ तांबे, महामित्र दत्ता वायचळे, मधुकर गिरी, प्रभाकर शिरसाठ, विजय खंडेराव, विजय बागुल, बस्तीराम कुंदे, बापु चतुर, प्रमोद काकडे तसेच सिन्नर व नाशिकचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड... बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज  अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार  केल्याची...
हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 
महागाईविरोधात अनोखे अभियान ; ‘खर्चे पे चर्चा’ 
एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...
श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी : राहुल गांधी
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...