भारतीय क्रिकेट टीमच्या या मोठ्या खेळाडूला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल
आधुनिक केसरी न्यूज
चेन्नई : भारताच्या टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये जोरदार सुरुवात करुन वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी शुभारंभ केला आहे. टीम इंडिया आणि क्रिकेट चाहते यामुळे आनंदात आहेत. पण आता टेन्शन वाढवणारी एक बातमी आली. टीम इंडियाच्या एका प्रमुख प्लेयरला रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे अभियान सुरु होण्याच्या आधीपासूनच शुभमन गिल आजारी आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्याला डेंग्युची लागण झाली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही.
डेंग्युमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावधगिरीच पाऊल म्हणून शुभमनला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमनची प्रकृती आणखी खराब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमन गिल आता अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा खेळणार नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, डेंग्युमुळे शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तान विरुद्ध त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. सध्याची त्याची स्थिती पाहता, गिल लवकर फिट होईल, असे वाटत नाही.
चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी आता नवी दिल्लीत आली आहे. पण गिलची प्रकृती बिघडल्याने चेन्नईतच त्याच्यावर मेडीकल टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. पाकिस्तान विरुद्ध तो खेळेल अशी अपेक्षा आहे.
Comment List