१८ हजार कोटींचा मालक एका ट्विटने झाला कंगाल, कंपनीचे मूल्य झाले अवघे ७४ रुपये
आधुनिक केसरी न्यूज
दिल्ली : भारतीय वंशाचे उद्योगपती बीआर शेट्टी यांचे नाव एकेकाळी करोडपती उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते, ते एकूण १८ हजार कोटी रुपयांचे म्हणजेच सुमारे ३.१५ अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅक यांसारख्या आलिशान कार आणि खासगी जेट होते. पण बदलत्या काळानुसार बीआर शेट्टींच्या १८ हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मूल्य केवळ ७४ रुपये झाले.
बावगुथू रघुराम शेट्टी कामाच्या नवीन संधी शोधण्यासाठी केवळ ८ डॉलर्स घेऊन आखाती देशात पोहोचले होते. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी युऐई मध्ये एनएमसी हेल्थ नावाची सर्वात मोठी आरोग्य कंपनी स्थापन केली होती. काही वर्षांतच त्यांचे नाव दुबईसह जगातील श्रीमंतांच्या यादीत आले. बीआर शेट्टी यांनी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत दोन मजले २५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते.
२०१९ मध्ये यूके स्थित कंपनी मडी वॉटर्सच्या एका ट्विटने बीआर शेट्टीची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मड्डी वॉटर हे कार्सन ब्लॉक नावाच्या शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या ट्विटनंतर या शॉर्ट सेलर कंपनीने बीआर शेट्टी यांच्या कंपनीचा अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीवर १ अब्ज डॉलर्सचे कर्ज लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर एनएमसी आरोग्याची स्थिती इतकी वाईट झाली की १८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली कंपनी इस्रायल आणि यूएईस्थित कंपनीला अवघ्या १ डॉलरला विकली गेली. यानंतर त्याच्या मूल्यांकनात सतत घट होत गेली आणि शेवटी ही कंपनी केवळ १ डॉलरच्या किमतीला विकली गेली.
Comment List