चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार : आ.किशोर जोरगेवार

पुष्पहार अर्पण करत शिवरायांना अभिवादन

चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार : आ.किशोर जोरगेवार

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्याचा योग लाभला आहे. पण इथेच थांबायचे नाही. याच ठिकाणी लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. ही केवळ एक कल्पना नव्हे, तर हा आपला संकल्प आहे. याबाबतच्या सर्व प्रक्रिया गतीशीलपणे पुढे नेण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे नेते विजय राऊत, अनिल फुलझेले, दशरथसिंग ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, संदीप आवारी, रवी आसवानी, रघुवीर अहिर, तुषार मोहुर्ले, माजी नगरसेवीकां वंदना तिखे, वनिता डुकरे, माजी नगरसेवकर देवानंद वाढई, रवी लोणकर, प्रशांत चौधरी, विकास खटी, अरुण तिखे, शेखर शेट्टी, विनोद शेरकी, रमेश भुते, तेजा सिंग, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रमोद शास्त्रकार, वंदना हजारे, कौसर खान, विमल कातकर, संगीता लोखंडे, प्रवीण गिलबिले, मीना गरडवा, राजू घरोटे, ईश्वर विरुटकर, आशा मोगरे, रेणू घोडेस्वार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी ते म्हणाले, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ एक स्मारक नसून, तो आपल्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्तंभ असणार आहे. या पुतळ्याकडे पाहताच आपल्या पिढ्या शिवरायांच्या पराक्रमाची आठवण ठेवतील, त्यांचे विचार आत्मसात करतील आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल. हा पुतळा म्हणजे आपल्या इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्यातील प्रेरणास्थान असेल.यासंबंधी सर्व प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. रामकुमार अक्कापेल्लीवार या शिवप्रेमीने याबाबत जवळपास सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. शेवटच्या काही परवानग्या मिळविण्याचे काम सुरू असून, नुकतीच महानगरपालिकेत बैठक घेऊन प्रशासनाला लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ स्मारक उभारणे हा उद्देश नाही, तर हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी त्याचे भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप असावे, यावर भर दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे सामर्थ्य, शौर्य आणि न्यायाचा आदर्श होते. त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. शिवराय हे केवळ एका व्यक्तीचे किंवा एका गटाचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांचा पुतळा हा न्यायप्रिय राज्यकारभाराची जाणीव ठेवणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. हा स्मारक उभारणीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, आणि भविष्यात ही भूमी केवळ एक स्मारक नसून, प्रेरणेचे, सन्मानाचे आणि इतिहासाच्या उज्ज्वल आठवणीचे केंद्र बनेल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि 22 गरिबांना घरकुलाचे वेगळेच महत्त्व असते. घरकुल मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे...
कोर्टीमक्ता येथील राज्य राखीव पोलीस बटालियन ठरणार देशातील सर्वोत्तम सुरक्षा केंद्र
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार : आ.किशोर जोरगेवार
खळबळजनक :  सुरेश धस - धनंजय मुंडे भेटीवर सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा....
विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री फडणवीस