सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला

सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर 'सायबर' हल्ला झाला झाला असून यात अज्ञात व्यक्तीने तब्बल 3 कोटी 70 लाखांवर डल्ला मारला असल्याचे निदर्शनास आले आहे.'आरटीजीएस' व 'एनईएफटी' प्रणालीद्वारे खातेदारांच्या खात्यात रक्कम वळती केली जात असताना सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण यंत्रणाच हॅक करूत ३३ ग्राहकांच्या खात्यांतील ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये हरियाणा व नोएडा येथील अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळते केले असल्याचे सांगितल्या जात आहे. बँकेचे मुख्य शाखेचे प्रभारी व्यवस्थापक राजू पांडूरंग दर्वे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेमार्फत 'आरटीजीएस' व 'एनईएफटी' प्रणालीसाठी नागपुरातील ट्रस्ट फिनटेक लि. या कंपनीसोबत 'कोअर बँकिंग सिस्टिम' करिता करार केला आहे. येस बँकची यंत्रणा वापरण्याकरिता येस बँक व ट्रस्ट फिनटेक मध्ये करार आहे. याच माध्यमातून चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व 'आरटीजीएस' व 'एनईएफटी' व्यवहार होत असतात. धनादेवी मजूर सहकारी पतसंस्थेचे ग्राहक इम्रान पठाण यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गौतमी एन्टरप्रायजेस यांच्या खात्यात १३ लाख २६ हजार ६८० रुपयांचा 'आरटीजीएस' करण्यासाठी ७ फेब्रुवारीला अर्ज केला होता. मात्र 'आरटीजीएस' केलेली रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमाच झाली नाही. १० फेब्रुवारीला पठाण यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात तक्रार दिली. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाला ही बाब लक्षात आणून दिली. बँकेने ट्रस्ट फिनटेक लि. यांचे प्रतिनिधी राकेश कवाडे यांना माहिती दिली. कवाडे यांनी बँकेतील यंत्रणा तपासली असता ७ आणि १० फेब्रुवारीला विविध सहकारी पतसंस्थांच्या शाखेतील ग्राहकांसोबतच इरतही ग्राहकांचे 'आरटीजीएस' व 'एनईएफटी' व्यवहारांच्या प्रणालीमध्ये गडबड दिसून आली. ज्या खात्यांत रक्कम जमा व्हायला हवी होती तिथे रक्कम जमा न होता हरियाणा येथील त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे दिसून आले. 


 हरियाणात वळवली रक्कम 

अज्ञात व्यक्तीने बँकेची संपूर्ण यंत्रणा हॅक करून हा गैरव्यवहार केला आणि बँकेच्या ३३ ग्राहकांच्या खात्यातून ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपयांवर डल्ला मारला . ही संपूर्ण रक्कम हरियाणा येथील एका अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळवण्यात आली. बँकेने या प्रकरणाची तक्रार 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग' या 'पोर्टल'वर केली आहे. तसेच चंद्रपूर मध्ये रामनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम मिळवण्यात यश

तक्रारीनंतर चंद्रपूर पोलीस विभागाने तातडीने दखल घेत आपली चक्रे फिरविली व गुन्हेगारांनी डल्ला मारलेल्या एकूण रकमेपैकी एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम मिळविण्यात पोलिसांना यश आले. मात्र, उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित तिसरा व्यक्ती अर्थात खातेदार हा हरियाणा येथील आहे. त्यामुळे हरियाणा येथे विशेष पथक पाठवले जाईल. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासाची सूत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि 22 गरिबांना घरकुलाचे वेगळेच महत्त्व असते. घरकुल मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे...
कोर्टीमक्ता येथील राज्य राखीव पोलीस बटालियन ठरणार देशातील सर्वोत्तम सुरक्षा केंद्र
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार : आ.किशोर जोरगेवार
खळबळजनक :  सुरेश धस - धनंजय मुंडे भेटीवर सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा....
विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री फडणवीस