लोणी येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष विनोद पाटील बोडखे यांचे रक्तदान करण्याचे आवाहन

लोणी येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रिसोड: कुळवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथे सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती तसेच व्हॉईस ऑफ मीडिया रिसोड तालुका, संभाजी ब्रिगेड रिसोड, ग्राम पंचायत कार्यालय लोणी बुद्रुक यांच्या वतीने लोणी बुद्रुक येथे ता.18 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही उलथविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या कार्याची तुलना कदापि होणे शक्य नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे ही प्रत्येक भारतियांची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने "रक्तदान" ही एक समाजाची निकड आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरीही अद्याप रक्ताला पर्याय उपलब्ध करू शकले नाही. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने लोणी बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबिराचे संयुक्तिकरित्या आयोजन करण्यात आले आहे. यामधे सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती लोणी बुद्रुक तसेच व्हॉईस ऑफ मीडिया रिसोड तालुका,संभाजी ब्रिगेड रिसोड तालुका,सरपंच व सदस्य ग्राम पंचायत कार्यालय लोणी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील शिव भक्तांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया चे रक्तदान करण्याचे आवाहन

सन 2025 मधे संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताहे. शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून शिवप्रेमींनी रक्तदान करावे.आज विज्ञान खूप पुढे गेले असले तरीही मात्र रक्ताला पर्याय उपलब्ध करून देऊ शकले नाही. तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे,पंथाचे असोत आपले आचार,विचार भिन्न असू शकतात मात्र माणूस म्हणून आपले सर्वांचे रक्त मात्र सारखेच आहे.आज समाजाला रक्ताची नितांत निकड असल्याने शिव जयंतीच्या निमित्ताने आपण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या उपक्रमामध्ये सर्व शिव प्रेमींनी सहभागी होऊन शिवरायांना अभिवादन करावे.असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार : पालकमंत्री डॉ.उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि 22 गरिबांना घरकुलाचे वेगळेच महत्त्व असते. घरकुल मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे...
कोर्टीमक्ता येथील राज्य राखीव पोलीस बटालियन ठरणार देशातील सर्वोत्तम सुरक्षा केंद्र
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार : आ.किशोर जोरगेवार
खळबळजनक :  सुरेश धस - धनंजय मुंडे भेटीवर सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा....
विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री फडणवीस