मोठी बातमी : कॉंग्रेसला खिंडार.... 'या' विद्यमान आमदार अजित पवार गटात
On
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
आमदार सुलभा खोडके यांच्यासमवेत अमरावतीचे माजी महापौर शेख जफर शेखजब्बार, सरचिटणीस अॅड. शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयुब भाई, सचिव आसिफभाई अशरफ अली, समाजसेवक हाजी रफिक, अॅड. शब्बीर भाई, अ-रज्ज्जाक उर्फ रज्जु चचा, जोएब भाई बरहानपुरवाली, आणि मुस्तफा भाई बुरहानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्वांचे अभिनंदन करतानाच आपण सर्व मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट होऊया आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देऊया असे आवाहन अजित पवार यांनी केले.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
Latest News
भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर
03 Jan 2025 08:33:34
रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम
Comment List