साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत त्याच्याकडे व्यक्त केलेला राग आणि या रागाच्या भरातच आपल्या अभंगाची गाथा इंद्रायणी मध्ये समर्पित करत त्याला जाब विचारणारे तुकाराम महाराज आणि त्यांच्या अर्धांगिनी आवली यांचा थेट संवाद ऐकत ऐकत एकूणच तुकारामांच्या जीवन प्रवाहाच अगदी लाईव्ह दर्शन नागपूरकरांनी घेतलं आणि साक्षात तुकारामांच्या झालेल्या दर्शनाने नागपूरकर अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होतं विश्व केसरी फाउंडेशन, नागपूर द्वारा आयोजित आनंदडोह या योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित एकपात्री प्रयोगाचं. विश्व केसरी फाउंडेशन ही ब्राह्मण समाजातील तरुणांनी एकत्र येत ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या नाजूक परिस्थिती असणाऱ्या समाज बांधवांना मदतीसाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवेच्या अंतर्गत लागणारा निधी गोळा करण्यासाठी या एकपात्री प्रयोगाच आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक सायंटिफिक सभागृह येथे आयोजित या नाट्यप्रयोगाला नागपूरकरांनी अलोट प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र माहूरगड येथील प्रधान अध्यापक निलेश केदार गुरुजी, जे.सी.आर. कन्सल्टंट येथील पी.आर.ओ. प्रमोद तिजारे, प्राचार्य अलका जोग, पारविद्यावाचस्पती तथा श्री शिवशक्ती पीठ सेवा समितीचे संस्थापक, दत्ता महाराज आदींची उपस्थिती होती.
आनंदडोह या एकपात्री प्रयोगाअंतर्गत सुप्रसिद्ध नाट्य लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले योगेश सोमण यांनी संत तुकारामांचा थेट विठुराया सोबत झालेला संवाद आणि तुकोबांच्या अभंगांमुळे जागृत होत चाललेल्या समाजामुळे तत्कालीन परिस्थितीला तुकाराम महाराजांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागलं याचं अगदी सुंदर सचित्र असं कथानक योगेश सोमण यांनी आपल्या कसदार अभिनयातून रसिक प्रेक्षकांसमोर सादर केलं. रसिक प्रेक्षकांनी याला उदंड असा प्रतिसाद दिला. तब्बल दीड तास चाललेल्या या नाट्यप्रयोगाला नागपूरकर रसिकांच्या उदंड प्रतिसादाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आणि पाहता पाहता सर्व सभागृह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल नामानीच या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे औचित्याने दैनंदिन जीवनात आवश्यक ती नित्य कर्मविधी कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करण्यात यावी या दृष्टिकोनातून धर्मशास्त्र नित्य कर्मविधी या पुस्तकाचेही विमोचन करण्यात आले. वेदमूर्ती श्री सारंग दुर्गे गुरुजी लिखित या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याला श्री शिवशक्ती पीठ सेवा समिती उमरेड चे श्री दत्ता महाराज, पुस्तकाचे लेखक वेदमूर्ती श्री सारंग दुर्गे गुरुजी, माहूर येथून आलेले वेदमूर्ती श्री निलेश केदार गुरुजी, वेदमूर्ती पुरुषोत्तम कुलकर्णी, वेदमूर्ती सागर शर्मा, वेदमूर्ती भागवत कुलकर्णी वेदमूर्ती अभिषेक जोशी गुरुजी आदींची उपस्थिती होती. या पुस्तकाची संकल्पना विश्व केसरी फाउंडेशनचे सचिव सीए. श्रेयस इंदुरकर यांची होती तर प्रकाशन अभिमन्यू जोग यांचे होते.या कार्यक्रमाच्या औचित्याने मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. आपला धर्म, संस्कृती, श्लोक पठण अशी नित्य कर्मवीधी अत्यंत कमीत कमी वेळामध्ये सहज करता यावी तसेच या नित्य कर्मविधी चे वैज्ञानिक दृष्टिकोनातून होत असलेले फायदे याचे विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या औचित्यानी विश्व केसरी फाउंडेशन करिता निधी संकलन करण्यात ज्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले अशा टीमचा संस्थे तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्या करीता विश्व केसरी फाऊंडेशन चां संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेतलेली.रसिक प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक शाम हेडाऊ यांनी केले.
Comment List