शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार

आधुनिक केसरी न्यूज

यासीन शेख 

लोणार : लोणार शहरापासून ४ किमी वर असलेल्या शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरील शारा गावाजवळ गतिरोधका जवळ दुसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरोडोखरांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करत लोणार येथील सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली. लोणार येथील आदित्य अजितकुमार संचेती वय ४० वर्ष हे आपले सुलतानपूर येथील दर्शन ज्वेलर्स त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान दु‌कान बंद करुन लोणार येथे परत येत असतांना शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शारा गावाजवळ वळणावर चोरट्याने पाठलाग करत होन्डाशाईन गाडी आडवी लाऊन ३ जणांनी संचेती यांना मारहान करून बंदुकीचा धाक दाखवत २७लक्ष ३१ हजाराच रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लक्ष रुपये नगदी घेऊन पसार झाले.घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले,लेखनिक गणेश लोढे,विशाल धोंडगे,जमादार संजय जाधव,गोपनीयचे संतोष चव्हाण,विठ्ठल चव्हाण,बिट जमादार संतोष चव्हाण,अनिल शिंदे,गजानन डोईफोडे,गजानन दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.आदित्य संचेती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या नंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी भेट दिली घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.फिर्यादी आदित्य अजितकुमार संचेती यांच्या तक्रारी वरून लोणार पोलिसांनी अझ्यात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ३०० (४) ३५१ (२)३(५) नुस्खार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले करत आहे.
चोऱ्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार