भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!

भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड  मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : मुनगंटीवार अहिर वाद हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहेच. 2019 च्या निवडणुकीनंतर हा वाद स्पष्टपणे समोर आला होता आणि या वादातूनच हंसराज अहिर यांचा पराभव झालेला होता. शिवाय 2024 ला सुद्धा भाजपाला लोकसभेची सीट गमवावी लागली आहे. एवढे सगळे होऊन सुद्धा अजूनही भाजपमधील अंतर्गत कलह शमलेला नाही असे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना आता धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र लागलेल्या बॅनर वरून भाजप मधील अंतर्गत कलह आता उघड्यावर आला आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मागणारे ब्रिजभूषण पाझारे यांनी शहरात सर्वत्र धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छांचे बॅनर लावलेले आहेत. परंतु या बॅनरवर हंसराज अहिर यांचा फोटो मात्र स्टिकर लावून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे हंसराज अहिर समर्थक प्रचंड नाराज झाले असून या नाराजीचा फटका ब्रिजभूषण पाझारे यांना नक्कीच बसणार आहे.

मुनगंटीवार - अहिर हा वाद होताच. परंतु आता मुनगंटीवारच्या समर्थक असलेल्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वामध्ये सुद्धा हंसराज अहिर यांच्या बद्दलची एलर्जी या बॅनर वरील स्टिकर मुळे समोर आली आहे. बॅनर वर नेहमीच शीर्षस्थ नेत्यांचे फोटो मोठ्या स्वरूपात घेतले जातात. सध्या चंद्रपूरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लागले असून ब्रिजभूषण पाझारे यांनी लावलेल्या बॅनरवर हंसराज अहिर आणि सुधीर मुनवंटीवार यांचा फोटो छापण्यात आला होता. परंतु बॅनर लावत असताना मात्र हंसराज अहिर यांचा फोटो स्टिकर लावून बंद करण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात येताच हंसराज अहिर समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. हंसराज अहिर हे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री असून सध्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे शीर्षस्थ नेत्यांच्या फोटोमध्ये हंसराज अहिर यांचाही फोटो बॅनर वर येणे अपेक्षित होते. परंतु असे असताना सुद्धा बॅनर प्रिंट झाल्यानंतर सुद्धा त्यावर स्टिकर लावून फोटो झाकण्याचा प्रयत्न करणे हा चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेला प्रकार आहे. या प्रकारामुळे शहरात चांगली चर्चा सुरू झाली असून मुनगंटीवार समर्थकांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना सुद्धा अहिर यांची इतकी एलर्जी का ? की त्यांच्यावर  नेत्यांचा दबाव आहे ? असा प्रश्न आता सगळीकडे चर्चिल्या जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार