प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात

प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या निमित्ताने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायिका कळूबाई खरात आणि प्रसिद्ध गायक राहुल शिंदे हे बुद्ध-भीमगीत गायणार आहेत.

बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या निधीतून येथे तयार होणार असलेल्या विपश्यना केंद्राच्या कामाचे भूमिपूजन उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्त महाथेरो डॉ. सुमनवंत्तो यांच्या वतीने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात आणि राहुल शिंदे चंद्रपूरात येणार असून, या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन धम्मभूमी महाविहारच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार