जळगाव रोड ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणा चे मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

जळगाव रोड ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणा चे मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर :  शहरातील व्हीआयपी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव रोड ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याचे रूप पालटणार असून राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रिटकरण कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पार पडले. या कामासाठी साधारण 66.46 कोटी रुपये अंदाजित रक्कम खर्च करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ यांच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

विमानतळ ते विभागीय आयुक्त कार्यालय, सुभेदारी विश्रामगृहाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. संबंधित रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याचे विद्रूपीकरण झाले होते. या खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मागणी करण्यात येत होती. यासाठी पूर्व मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी पुढाकार घेऊन आपल्या विशेष प्रयत्नातून लेमन टी हॉटेल पासून ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे लवकरच या रस्त्याचे काम सुरू होवून नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत.

 या प्रसंगी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, आचारसंहिता लागण्यापूर्वी शहराच्या विकासासाठी जेवढा निधी आणण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं निधी आणू आणि शहराचा विकास करू अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. त्याच बरोबर शहरातील सिडको घर धारकांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली असून सिडको मध्ये राहणाऱ्या रहिवासी यांची घरे लिज होल्ड वर असलेली घरे आता फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी खा.डॉ भागवत कराड, संजय कोडगे, मंगलमूर्ती शास्त्री, गोविंद केंद्रे, अनिल मकरीये, प्रमोद राठोड, राजेंद्र जंजाळ, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, माधुरी अदवंत,  सूर्यकांत जायभाये, नितीन खरात, विवेक राठोड, रामचंद्र जाधव, संजय बोराडे, महेश माळवतकर, जालिंदर शेंडगे, नितीन चित्ते, बालाजी मुंडे, दामू अण्णा शिंदे, ताराचंद गायकवाड, प्रशांत नांदेडकर, राहुल खरात, वर्षा साळुंखे, रेखा जयस्वाल, गीता घोडतुरे, गीता कापुरे, जयश्री गायकवाड, यांच्या सह मोठ्या प्रमाणावर नागरिकांची तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

नागरिकांकडून मंत्री श्री अतुल सावे यांच्या सत्कार

वसंतराव नाईक चौक ते हर्सूल टी पॉइंट हा जळगाव रोडचे सिमेंट काँक्रिटकरण करण्यात येणार आहे तसेच सिडको ची घरे ही फ्री होल्ड होणार असल्याने नागरिकांनी मंत्री अतुल सावे यांचे अभिनंदन करत त्यांचे सत्कार केले. यावेळी नागरिकांनी अनेक वर्षांचे प्रयत्न आज यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार