नांदा तांडा येथे वीज कोसळून शेतकरी ठार
आधुनिक केसरी न्यूज
गोकुळसिंग राजपूत
सोयगाव : तालुक्यातील नांदा तांडा येथे रात्री वीज कोसळून शेतकरी ठार;-शेतातून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यावर वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता नांदा तांड्यात घडली दरम्यान सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रात्री शवविच्छेदन साठी साठ किमी अंतरावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शव आणावे लागले आहे तुकाराम मोहन चव्हाण( वय ४०) असे वीज कोसळून ठार झालेल्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे सदर शेतकरी पोळा सण साजरा केल्या वर शेतात गेले असता पाऊस सुरु झाला त्यामुळे पाऊस थांबे पर्यंत ते शेतात थांबले मात्र रात्री आठ वाजता घरी जाताना त्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे महसूल विभागाच्या वतीने तलाठी विशाल शेलकर यांनी तातडीने पंचनामा करून प्राथमिक घटनेचा प्राथमिक अहवाल सोयगाव तहसील कार्यालयात सादर केला दरम्यान सोयगाव सह तालुक्यात सोमवारी रात्री सात वाजेपासून पुन्हा विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने सुरुवात केली होती दरम्यान नांदा तांडा येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला त्यास शवविच्छेदन साठी सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत शेतकऱ्याचे शव साठ की मी अंतरावर सोयगावला आणावे लागले होते त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे
Comment List