आपेगावात पोळ्याचा मान 'माऊली'लाच ; गावकरी जपतात शेकडो वर्षाची परंपरा
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : पोळा म्हटलं कि पुर्वी गावच्या वेशीत पोळा फोडण्यावरुन वाद होयाचा परंतु सन गुरांच्या कामगिरी बद्दल शेतकरी आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जायचा आणि गावागावात पोळा फोडण्यासाठी माणंस भांडायचे मग पोलीस केस ,कोर्ट कचेरीने परेशान होयायचे परंतु आता आसे चित्र काही दिसत नसुन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगाव आसलेल्या श्रीक्षेत्र आपेगावी पोळाचा मान हा शेकडो वर्षांपासून माऊलींना आसुन पोळ्याच्या दिवशी मंदिर संस्थानच्या वतीने गावकरी हरीनामाच्या गजरात माऊलींच्या मंदिरात असलेल्या बैल जोडीला वेशीतुन गाजत वाजत घेवून येत हनुमान मंदिरासमोर पुजा होवुन गावकर्याच्या उपस्थिती वेशीतील तोरण तोडण्याचा मान माऊलीचा असल्याने संस्थानच्या वतीने सायंकाळी तोरण तोडून पोळा साजरा केला जातो.परंतु यानंतरही वेशीतुन फक्त माऊलीचेच बैल जोडी जाते त्यामागे कुणीही बैलजोडी घेवून जात नसल्याची परंपरा आजही आपेगावात पाळली जात आहे.
हा दिवस गुरांना त्यांच्या कामगिरीसाठी आभार म्हणून साजरा केला जातो. सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं. त्यांच्या शिंगांना रंगवलं जातं. त्यांना फुलांची माळ घातली जाते. त्यांची ढोळ ताश्यासह मिरवणूक काढून त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य दाखवलं जातं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरणपोळी, करंज्या, विविध भाज्या, बाजरा खिचडी अशा पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. या दिवशी त्याच्याकडून कुठलेही काम घेत नाही. त्यांच्यासमोर नाच-गाणे करुन मनोरंजन केलं जातं.
Comment List