काळजाचा थरकाप उडवणारी घटना ; सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांना मारहाण,गरम चाकूने चटके अन्...

काळजाचा थरकाप उडवणारी घटना ; सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांना मारहाण,गरम चाकूने चटके अन्...

आधुनिक केसरी न्यूज 

वसई : चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असताना वसईत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सावत्र आईने ७ आणि ८ वर्षांच्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. तिने मुलांच्या गुप्तांगानाही गरम चाकूने चटके दिले आहेत. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईत राहणार्‍या नागनाथ सावरगळी (३२) यांचा पहिली पत्नी चिन्नमा सोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर नागनाथ यांनी २०२३ मध्ये नेहा सावसगळी (२७) हिच्यासोबत दुसरे लग्न केले. नागनाथ यांना पहिल्या पत्नीसपासून ७ वर्षांचा अंकुश आणि ८ वर्षांचा आयुश अशी दोन मुले आहेत. नागनाथ यांचा कुरियरचा व्यवसाय असून नेहा गृहीणी आहे. कामानिमित्त नागनाथ बाहेर असायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुलांच्या वागण्यात बदल जाणवला. मुले अबोल आणि घाबरलेली दिसू लागली. विचारणा केली तेव्हा मुले काही बोलत नव्हती. नागनाथ यांना मुलांच्या शरिरावर जखमा दिसल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मग मुलांनी सावत्र आई मारत असल्याचे सांगितले. त्यांच्या गुप्तांगाला गरम चाकूचे चटके दिले. लाटण्याने त्यांना अमानुष मारहाण केली. यानंतर नागनाथ यांनी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वालीव पोलिसांनी या प्रकरणी नेहा सावगरळी विरोधात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ त्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलांना चटके दिल्याची घटना जून मध्ये घडली आहे. परंतु काल मुलांच्या पित्याने तक्रार दिल्यानंतर आम्ही आम्ही गुन्हा दाखल केला असून या याप्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी दिली. मुलांची प्रकृती आता ठिक असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मुलांना ती खूप दिवसांपासून मारहाण करत होती. मात्र तिने मुलांना धाकात ठेवल्याने ते काही बोलत नव्हती. ती माझ्यामुलांकडून घरातील कामे करवून घेत होती, असे मुलांचे पिता नागनाथ सावरगळी यांनी सांगितले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस