महायुती सरकारचे नामांतर....!

सुप्रियाताई सुळे म्हणतात हे म्हणजे 'एमबीबीएस सरकार'

महायुती सरकारचे नामांतर....!

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे :गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यात आज अतिशय गंभीर परिस्थिती असून पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. मी आरोप करत नाही हा डेटा सांगतो आहे, हा केंद्र सरकारचा डेटा असेल. महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. आधी नागपूर क्राईम कॅपिटल होते आता पुणे होत आहे, अशा शब्दात पुण्यातील गुन्हेगारीवरुन सुप्रियाताई सुळेंनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. २०० आमदारांचे सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले, विकास कोणाचा केला या सरकारने ? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे, असे सुप्रियाताई सुळेंनी यांनी म्हटले आहे.

पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे. असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागातील घोटाळ्याचे आरोप केला होता. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष अगोदर लोकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री, आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे. रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे. महाराष्ट्रातले जे आमदार खासदार आज महायुती बरोबर  आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही. खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे. नक्की भ्रष्टाचारी कोण, या राज्यात भ्रष्टाचार कोण करत आहे, असा सवालही सुप्रियाताई सुळे यांनी विचारला. केंद्रीय संस्थांचा तपास मागे लावायचा, नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यातील महायुतीचे सरकार हे म्हणजे "एमबीबीएस सरकार" आहे.  महागाई, बेरोजगारी आणि भष्टाचारी वाढवणारे सरकार आहे या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे काय हाल आहे हे आपण सर्व पाहतच आहेत. दुधाला, साखरेला काय भाव आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर हे एमबीबीएस सरकार जाणार आहे असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...