मोठी बातमी : राज्यभरात राबवणार माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पीएचसी उपक्रम

मोठी बातमी : राज्यभरात राबवणार माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पीएचसी उपक्रम

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदी असताना जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात 'माझी शाळा आदर्श शाळा' व 'स्मार्ट पीएचसी' हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले असल्याने संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

काय आहे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पीएचसी उपक्रम ? 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणले. त्यातील दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पीएचसी उपक्रम. 

जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आधी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य भर्ती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या. 

या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे. 

आता शासनातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याने अख्या राज्यात जयंतराव पाटील पॅर्टन राबवला जाणार अशी चर्चा आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...