मोठी बातमी : युजीसी नेट परीक्षेवरून जयंत पाटील यांनी सरकारला लगावला 'हा' टोला
देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार?
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई :- युजीसी नेट परीक्षेचे पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १९ जून रोजी झालेली नेटची परीक्षाच रद्द केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, गुप्तचर अहवालात या परीक्षेच्या आयोजनात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नुकताच नीट परीक्षेत झालेला भोंगळ कारभार ताजा असताना हा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमूनचा आहे.
पुढे ते म्हणाले की, वर्षभर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात, या परीक्षाच ग्राह्य धरल्या जात नसतील तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम सरकार करत आहे. सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार असा प्रश्न निर्माण होतो.
Comment List