आता दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या दफ्तराला सुट्टी

शाळेत दफ्तर नेण्याची गरज नाही ;.शिक्षण विभागाचा निर्णय

आता दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या दफ्तराला सुट्टी

आधुनिक केसरी न्यूज 

 विनोद पाटील बोडखे

रिसोड : शैक्षणिक सत्र 24 -25 येत्या 1 जुलै पासून सुरू होत असून नवीन शैक्षणिक सत्रामधे  शालेय विद्यार्थ्यांमधे असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, वर्तन जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उद्दात्त हेतुने सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या सदर निर्णयामुळे
विद्यार्थ्यांच्या दप्तराला शनिवारी सुटी भेटणार आहे. तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभुती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक, कल्पनाशक्ती, नैतिक मुल्ये असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासिनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत असल्याने त्या पार्श्वभुमीवर शालेय जीवनात 'आनंददायी शानिवार' हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची शाळेत होणारी गळती, अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांच्या दप्तराला सुट्टी देण्या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचे पत्र प्राप्त झालेले आहे. राज्य पातळीवर विविध समित्या ह्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करत असतात.'त्याचाच एक भाग म्हणून आनंददायी शनिवार 'या उपक्रमाचा समवेश करण्यात आला असून निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. आणि अभ्यासातील रूची वाढण्यास मदत होईल.

बद्रीनारायण एल. कोकाटे
गटशिक्षणाधिकारी पं. स. रिसोड

नवीन शैक्षणिक सत्र 24-25 सुरू झाल्यानंतर या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. शाळांना शनिवारी कोणत्याही विषयाचे वर्ग घेता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शनिवारी शाळेत आल्यानंतर त्यांची अभ्यासापासुन सुटका होणार आहे. शाळेचा संपुर्ण वेळ हा आनंददायी शनिवारसाठीच करायचा आहे, असे स्पष्ट आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्याना अभ्यासापासुन विश्रांती मिळाल्यानंतर मात्र ते सोमवारी नियमित शाळेत येतील.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List