23 फेब्रुवारी; आजचे राशीभविष्य:  कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!

23 फेब्रुवारी; आजचे राशीभविष्य:  कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!

आधुनिक केसरी न्यूज

आज  जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....

मेष : शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ४

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

वृषभ : शुभ रंगः गुलाबी, शुभ अंक : ५

सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागिदारीच्या व्यवहारात काही मतभेद संभवतात.

मिथुन : शुभ रंगः राखाडी, शुभ अंक : ६

नोकरदारांवर वरीष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी आंगावर काढू नका. पतीपत्नीं मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.

कर्क : शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : २

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

सिंह : शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८

व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देईल. आज मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

कन्या : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ७

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृध्दीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल.

तूळ : शुभ रंगःस्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३

धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदु वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

वृश्चिक : शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : १

महत्वाच्या चर्चेत इतरांचंही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर ताबा ठेवायला हवा.

धनु : शुभ रंगः सोनेरी, शुभ अंक : ९

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका, कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होईल सतर्क रहा.

मकर : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : १

आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ६

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात तुम्ही आज करु शकता. आज तुम्ही फक्त ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल.

मीन : शुभ रंग: निळा, शुभ अंक : ८

नोकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा, संयम ठेवा.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड... बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज  अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार  केल्याची...
हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 
महागाईविरोधात अनोखे अभियान ; ‘खर्चे पे चर्चा’ 
एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...
श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी : राहुल गांधी
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...