वेळेवर निदान व उपचार झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ मुकुल घरोटे ; वाचा तज्ञ काय सांगतात..
आधुनिक केसरी न्यूज
किशोर पाटणी
शिर्डी - वेळेवर उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान उपचार होणे गरजेचे आहे. कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करत त्या आजारातून बाहेर पडावे असे आव्हान साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमधील कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद घरोटे यांनी सांगितल. साईबाबा संस्थानच्या त्रि सदस्य समितीच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षापासून शिर्डी येथे दर शनिवारी कॅन्सर उपचार मार्गदर्शन व भिजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले, असून गेल्या वर्षभरात जवळपास १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, सध्या पुरुषांमध्ये मुखरोग व फुफ्फुसाचे कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन अंडकोषाचा कॅन्सर दिसून येतो. पण वेळेवर लक्षणे दिसताच उपचार घेण्यासाठी मोठी गरज आहे. गर्भपिशवीचा कॅन्सर लसीकरण यासंबंधी माहिती दिली. निरोगी आरोग्यदायी आहार त्याचबरोबर जीवनशैलीत सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले. कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचा बळी जात आहे. वेळेवर निदान उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनत आहे. अशी खंत व्यक्त केली रुग्णांनी वेळेवर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर शनिवारी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुकुंद खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार मार्गदर्शन व फीजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले आहे. वर्षभरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेऊन साईंच्या आशीर्वादाने ते बरे झाले आहे. त्यासाठी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन केले आहे.
Comment List