"महाआघाडी सरकारचे भवितव्य ठरवणारी राज्यसभेची निवडणूक"

आधुनिक केसरी 

 

प्रकाश महागांवकर, पुणे

सहा राज्यसभा जागांची निवडणूक दहा जूनला आहे. आणि लगेच वीस जूनला विधान परिषदेवर पाठवायच्या  जागांची निवडणूक आहे. 

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. ते कायम राहतील असे आत्ता तरी वाटत आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी ची आजची दुपारी तीन वाजे पर्यंत ची वेळ आहे. 

भाजपाचे महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार या पैकी कोण माघार घेतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 

परंतू शेवटच्या क्षणी भाजपा उध्दव ठाकरेंना त्यांचेवर केलेल्या उपकाराची जाणिव करून देईल असे वाटते. 

महा विकास आघाडीचे सरकार, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सोनियाजींचे आदेशाने राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन, राजकारणातील लबाड्यांचा अतिरेक करून, जनमताच्या स्पष्ट कौला विरोधात जाऊन, अभद्र आघाडी करून, स्थापन केलेले सरकार आहे. 

त्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी सर्व जातीभेद, धर्मभेद, नाती गोती, बाजूला सारून काम करणारे प्रामाणिक सरकार निवडण्यासाठी स्पष्ट मतदान केले होते.

शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढल्या मुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मतदान करण्याचे उद्देशानेच मतदान झाले. 

युती असल्यामुळे जिथे भाजपचा उमेदवार नव्हता तिथे मित्रपक्षाला मते दिली. 

केवळ त्या मुळे शिवसेनेला 56 आमदारांची बेगमी मिळाली. 

त्या लाटेत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणे स्वतंत्र लढली असती तर शिवसेनेचे फार तर दहा आमदार निवडून आले असते, असा तो कौल होता. 

परंतू संभाजीराजे छत्रपती यांना जसे तोंडघशी पाडून शिवसेनेने स्वतः तर शब्द फिरवलाच  पण त्याच बरोबर शरद पवार साहेबांनाही शब्द फिरवायला भाग पाडले. दोन वर्षापूर्वी फौजीया खान ला निवडूण आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देऊन. 

तसेच सहा महिन्यात उध्दव ठाकरेंना निवडून येणे गरजेचे असताना, 

कोविड 19 मुळे निवडणूका घेणे अवघड असताना, उध्दव ठाकरेंच्या विनंतीला मान देवून त्यावेळी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी समजूतदार पणा दाखवत निवडणूक होऊ दिली आणि तीही तडजोड करून बिनविरोध. 

आता जर त्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याने उध्दव ठाकरेंना एक उमेदवार मागे घ्या, शक्यतो संजय राऊत, तर उध्दव ठाकरे काय करतील ? 

अशा वेळी भाजप तीन आणि महाआघाडीचे तिघांचे प्रत्येकी एक प्रमाणे तीन बिनविरोध निवडून येतील. 

संजय पवार नवखा आणि सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना माघार घ्यायला भाग पाडणे सोपे आहे परंतू तो सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याचा अपमान ठरेल. 

जनमानसातील कोणत्याच कप्यात संजय राऊतांना  स्थान नाही. केवळ आघाडीचे निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना पहील्या पसंतीचा उमेदवार करणे संजय पवार वर आन्याय करणारे ठरणार आहे, 

आणि माघार न घेता निवडणूक लढवली तर  शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. 

कारण फक्त दहा मते भाजपला लागणार आहेत. ती मते सहयोगी पक्ष, सहयोगी अपक्ष आणि ईतर छोटे पक्ष भरून काढतील. उलट शिवसेनेला जवळपास एकोणवीस वीस मते लागणार आहेत. 

त्यात आरोपपत्रे दाखल झालेली असल्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाला मज्जाव केला तर गणिते अजून बिघडतील.

अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखून संजय राऊत या बेभरोशी, बेलगाम बडबड्या  करप्ट उमेदवाराला माघार घ्यायला लाऊन मावळ्यांचा यथोचित मान राखणे शिवसेनेच्या भवितव्यासाठी

चांगले ठरेल. 

नाहीतर सच्चा आणि कट्टर बाळासाहेबांच्या मावळ्यांनी आयुष्यभर फक्त सतरंज्याच  उचलाव्यात असा मेसेज जाईल. तोंड चोपडे आणि जनतेत काडीची किंमत नसणारे, नेत्यांचे चमचेच निवडून येतात असा  मेसेज सामान्य कार्यकर्त्यांना जाईल. 

त्यामुळे हट्ट सोडावा, दुराग्रह गुंडाळून ठेवावा आणि कठोर निर्णय घेऊन संजय राऊतांना बसवावे आणि शिवसेनेची गेलेली पत थोडी तरी सावरावी, ही उध्दवजींना उत्तम संधी आहे. 

शिवाय ठाकरे कुटूंबाला अडचणीत आणणाऱ्या बोलघेवड्या, भ्रष्ट माणसाला धडा शिकवल्याचे  पूण्य उध्दवजींना मिळेल. 

महाडीक हे मुरब्बी राजकारणी असून धनशक्तिचे मालक आहेत. 

कुस्त्यांचे डावपेच माहीत असणारे पैलवान आहेत. जिद्द व पाठबळ आहे आणि हीच उत्तम संधी पण आहे निवडून येण्याची. 

शिवाय एकदा राज्यसभेवर निवडून आले की विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण झोकून प्रचार पण करता येईल आणि सतेज पाटलांची गूर्मी पण शमवता येईल. 

छत्रपती शाहू महाराजांनी मात्र अनावश्यक वेळी छत्रपती संभाजी राजेंच्या विरोधात बोलून, आणि भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून घरातले मतभेद अकारण चव्हाट्यावर आणले, आणि छत्रपती असूनही जातीयवादी विचारसरणी उघड केली. 

असो, ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे. 

मी लिहीत असतांनाच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत असे कळाले आणि आजच संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी महाआघाडीची संयुक्त बैठक घेऊन आपले आघाडीचे चारही उमेदवार कसे निवडून आणायचे यावर विचारविनिमय करून आपले डावपेच आखण्यासाठी बैठक बोलावली आहे. 

माझ्या मते ही चुरशीची निवडणूक म्हणजे दोन्ही बाजूंना आपली शक्ती आजमावण्याची एक संधी आहे. 

यात भाजपा उमेदवाराचा पराभव झाला तर मात्र फडणवीस यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. 

जर तीनही उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आणले तर पक्षांतर्गत विरोधक म्हणजे पंकजाताई मुंढे, विनोद तावडे यांची बोलती बंद होईल आणि त्यांना दोघांनाही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत राहावे लागेल. 

जर यदाकदाचित भाजपचा तीसरा उमेदवार आला,  आणि शिवसेनेचे दोन्ही तसेच कॉंग्रेस चे लादलेले सुमार उमेदवार इम्रान (खान)  प्रतापगढी  यापैकी कोण पराभूत होईल हे पाहावे लागेल. 

भाजपने शिवसेनेला व्यवस्थित कात्रीत पकडले आहे. 

संजय पवार हरले तर पक्षात प्रचंड नाराजी होईल. 

शिवसेनेत उठाव होईल. आणि इम्रान प्रतापगढी हरले तर सोनियाजी  असहाय होतील. त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मते न दिल्याने आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करणे अवघड जाईल. सरकार कोसळेल. 

संजय पवार हरले तरी सरकार धोक्यात येणार आहे. 

भाजपचा प्रस्ताव ऐकायला हवा होता. राज्यसभेची  एक जादा जागा देऊन विधान परिषद ची एक आमदारकी वाढवून घेणेच झाकल्या मुठी सारखे झाले असते. 

आता भाजप सर्व प्रकारचु पूर्ण ताकद  लावून मुन्ना महाडीक यांना निवडून आणणारच.

जर इम्रान प्रतापगढी यांना पक्षादेश शिरसावंद्य माणून कॉंग्रेस च्या सर्व 44 आमदारांनी मते दिली तर संजय राऊतांचा गेम व्हावा. बिचाऱ्या संजय पवार चा नव्हे. 

कारण मनीध्यानी नसताना त्यांना गाजर दाखवण्यात आले आहे. संजय राऊत यांनी स्वतःच  आपणा स्वतःला एक क्रमांकाचा उमेदवार ठरवून संजय पवारला द्वितीय दर्जा दिला आहे. आता पक्षप्रमुख म्हणून उध्दवजी ठाकरे यांनी निवडून येण्याची जबाबदारी संजय राऊतांवर टाकून पक्षाचे पहीली 42 मते संजय पवारला द्यावीत आणि शिल्लक सेनेचे अधिक राष्ट्रवादीचे मतांसह इतर पक्षांची व अपक्षांची मते मिळवून निवडून येऊन दाखवावे असे आदेशच संजय राऊत यांना द्यावेत. 

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List