मग्रूर अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही कामामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ

मग्रूर अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही कामामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ

आधुनिक केसरी न्यूज

सचिन कोरडे

धाराशिव : जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पवनचक्की उभारणीचे काम चालू आहे. तालुक्यात ५ ते ६ कंपन्यांनी जवळपास १५० पवनचक्की उभी केली असून या कंपनीत मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या उपकंपन्या आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतात मनोरा उभा करण्याचे अथवा तारा ओढण्याचे काम करत असताना शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी घेत नाहीत. हुकूमशाही व दंडूकशाही पद्धतीने शेतकऱ्यांना न जुमानता काम करत आहेत. याकरिता शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. यामध्ये कंपनीने कोणत्याही सरकारी विभागाची परवानगी घेतलेली नाही, असे प्रथमदर्शनी माहीत होत आहे. सदर कंपनीला काही सरकारी अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे समजून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी, कळंब तसेच तहसीलदार, वाशी यांचा सहभाग आहे. 

वास्तविकपणे पहायला गेल्यास सदर कंपनीने परवानगीची कागदपत्रे दाखवून शेतकऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन त्यांना त्यांच्या बाधित होणाऱ्या शेतीचा योग्य मोबदला देऊनच शेतीतून काम सुरू करणे गरजेचे आहे. मात्र सर्व कायदे व नियम यांना ढाब्यावर बसवून कंपनीचे असे हुकूमशाही उद्योग सुरू आहेत. ही अतिशय चुकीचे असून नागरिकांमधून याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यातूनच दहिफळ, ता. वाशी येथील शेतकरी श्री. तेजस वीर याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दि. ०७/०४/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, कळंब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तसेच त्यांच्या मृत्यू साठी उपविभागीय अधिकारी, कळंब व तहसीलदार, वाशी यांना जबाबदार धरण्याचे आवाहन शासनाला केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तो मुळातच अल्पभूधारक आहे. असे असताना जर त्याची शेती अजून बाधित झाली तर त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. तसेच कंपनी त्यांच्या बाधित होणाऱ्या क्षेत्राचा योग्य मोबदला देण्यासही तयार नाही. त्यामुळे भविष्यात हाल अपेष्टा सहन करुन उपाशी मारण्यापेक्षा आत्ताच आम्ही आत्मदहन करून मृत्यूला जवळ करतो.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रीन्यू पॉवर कंपनीने तालुक्यात ४६ पवनचक्की उभी केली आहे. K.S WIND AND RENEWABLES INDIA PVT LTD या उपकंपनीकडे घाटनांदूर ते सेलू २२० होल्ट लाईन पूर्ण करण्याचे काम आहे. या उपकंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता, जोरजबरदस्तीने काम केले आहे. मौजे दहिफळ येथील शेतकरी तेजस गोकुळ वीर यांनी आपल्या शेतातून टॉवर, तसेच तार लाईन जाऊ नये यासाठी तहसील कार्यालय वाशी तसेच उपविभागीय अधिकारी कळंब येथे मागील १ वर्षापासून पाठपुरावा केला आहे. सरकारी अधिकारी कोणताही योग्य निर्णय घेत नाहीत उलट कंपनीची बाजू घेऊन कंपनीला सहकार्य करत शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत काम कसे पूर्ण करता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. शेतकरी तेजस वीर यांनी सरकारी अधिकारी यांना विचारले असता उपविभागीय अधिकारी, कळंब बोलतात की मला वरिष्ठांचा खूप दबाव आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे उपविभागीय त्यांनी दि ०२/०४/२०२५ रोजी कंपनीला सरकारी दराने मूल्यांकन करून दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आली आहे. मौजे दहिफळ येथील शेतकरी तेजस गोकुळ वीर आपल्या कुटुंबासह उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब येथे दि ०७/०४/२०२५ रोजी सकाळी ११:३० वा आत्मदहन करणार आहे असे जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,धाराशिव तसेच पोलिस ठाणे, वाशी,कळंब यांना कळवले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

इंटॅकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सिंह ठाकूर यांचा सत्कार इंटॅकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सिंह ठाकूर यांचा सत्कार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : चंद्रपूरचे प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांची भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक...
चंद्रपुरात चैत्र पौर्णिमेनिमित्त ५१ फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण
मग्रूर अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही कामामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिना निमित्त  रविवारी कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा..!
पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश
सत्तेसाठी अजित पवारांची लाचारी
'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा