सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
आधुनिक केसरी न्यूज
पुणे : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दोन वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.आवंदा या पुरस्कारासाठी *सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर (चंद्रपूर)* आणि *अभिनेत्री व नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे)* यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, माजी आमदार अनंत गाडगीळ, परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी दिली.
Comment List