तुम्ही दोघ्या माझ्यासोबत माझे घरात चला; मला तुमच्या सोबत काम आहे; मग वाजवला  घराचा दरवाजा : गौलखेड गावातील संतापजनक घटना ....

तुम्ही दोघ्या माझ्यासोबत माझे घरात चला; मला तुमच्या सोबत काम आहे; मग वाजवला  घराचा दरवाजा : गौलखेड गावातील संतापजनक घटना ....

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

जळगाव जा :- गौलखेड येथील अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी राजू रामचंद्र पवार विरुद्ध ११ ऑक्टोबर रोजी पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव पोलीस स्टेशनमध्ये 573/2024 कलम 74,75 BNS सह कलम 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की, गौलखेड येथील अल्पवयीन पिडीत मुलगी व तिची त्याच गावात राहणारी आते बहिण आपल्या घरासमोर मोबाईल पाहत असताना,त्याच गावातील राजू पवार हा इसम तेथे आला व हाताने वाईट इशारे करून तुम्ही माझ्यासोबत माझे घरात चला, मला तुमच्या सोबत काम आहे असे म्हणाला.तेव्हा पिडित मुलीची  आतेबहीन तीच्या  घरी निघून गेली व पिडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरात गेली व आतून दरवाजा बंद करून  मोबाईल पाहू लगली. तेव्हा परत आरोपी हा तीथे आला व त्यांने त्या अल्पवयीन मुलीचा दरवाजा वाजवत , दरवाजा उघड मला तुझ्या सोबत काम आहे असे म्हणाला,तेव्हा पिडित मुलीने  त्याच गावात राहणारे तीचे  नातेवाईक विनोद पवार यांना फोन करून बोलावले.विनोद पवार हे तिथे आले असता आरोपिने तेथून पळ काढला . पीडित मुलीचे वडील घरी आले असता घडलेली सर्व हकीकत मुलीने आपल्या वडिलांना सांगितली.वडिलांनी मुलीला घेऊन जळगाव पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑक्टोबर रोजी आरोपी  राजू पवार विरुद्ध अशा आशयाची तक्रार दिली.
    दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजू पवार यांचे विरुद्ध जळगाव पोलीस स्टेशन मध्ये 573/2024 कलम 74,75 BNS सह कलम 12 पोक्को  अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरिक्षक अमोल पंडित व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार