पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची घटना ; चालक व वाहक बचावले...

पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची घटना ; चालक व वाहक बचावले...

आधुनिक केसरी न्यूज 

परभणी : जिल्ह्यात आज सोमवारी पावसाची संततधार सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन झालेच नाही. या पावसाने जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्प भरले असले तरी नदी व ओढ्याकाठच्या शिवारात पाणीच पाणी साचल्याने कापूस सोयाबीन या पिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो एकर शिवारातील ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्यात असल्याने मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना मानवत तालुक्यातील वझुर (बु.) या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली. वझुर गावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते. पहाटे बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु बस चालू होण्यास वेळ लागला. तो पर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी बसमधून उड्या मारल्या व जीव वाचवला. बस शंभर मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली. एका खांबाजवळ जावून ही बस अडकल्याची माहिती आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस