ऑल इंडिया पँथर सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर...
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संघर्षनायक,समाजभूषण पँथर दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा रविवार,दि.४ रोजी सुभेदारी शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी असंख्य सहकाऱ्यांसह सचिन खरात यांनी ऑल इंडिया पँथर सेना या संघटनेत प्रवेश केला.
संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले,ऑल इंडिया पँथर सेनेची,नव्या बांधणीला आता सुरुवात झाली आहे,यावेळी उपस्थित पदाधिकारी,परिवर्तनवादी चळवळीचे अध्यक्ष राहुल भाई मकासरे,महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे,मराठवाडा सचिव गजानन भाई साळवे,जिल्हा संघटक अमर भाई लोखंडे,जिल्हा आयटी प्रमुख शरद भाई साळवे,जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाई धुरंधर,युवक जिल्हाध्यक्ष कमलेश भाई दाभाडे,पँथर रोहित साळवे,पँथर अमोल गायकवाड, पँथर सतिष शिंदे, पँथर अमोल कोतकर व अन्य स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comment List