बी.एन.एन.महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त

बी.एन.एन.महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त

आधुनिक केसरी न्यूज 

भिवंडी : दि. 29 जुलै. रोजी शहरातील सर्वात जुन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयाला  नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतीच नॅक समितीद्वारे महाविद्यालयाला भेट देण्यात आली होती. नॅक पीयर  समितीने महाविद्यालयाची पाहणी केली. यात महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅक पाहणीत 3.11 गुणांसह 'ए' ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या या यशा बद्ल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डाॅ. अजय भामरे, कुलसचिव डाॅ. बळीराम गायकवाड, संस्थाध्यक्ष डाॅ. विजय जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, सचिव ॲड. रोहित जाधव आदींनी प्राचार्य, उपप्राचार्य, आय. क्यु. ए. सी. समन्वयक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल सोमवारी आभार सभा आयोजित  करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक वाघ म्हणाले की, बी.एन.एन. महाविद्यालयाने या उत्कृष्ट पुनर्मूल्यांकनासाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासाठी संस्थाध्यक्ष डाॅ. विजय जाधव यांनी  लागणाऱ्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. कष्टकरी समाजातील मुंल उच्चशिक्षित झाले पाहिजे. हा वसा घेऊन अण्णासाहेब जाधव यांचे स्वप्न  साकार करण्यासाठी प्रत्येक संकटकाळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी नेहमी प्रेरणा देत राहीले. 

ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण आणि पायाभूत सुविधा आमच्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. विद्यार्थी-केंद्रित अध्यापन-शिकवण पद्धती, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक अध्यापन पद्धतींमुळे आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि समृद्ध शैक्षणिक अनुभव मिळतो. आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, ज्यांना आम्ही 'कर्मयोगी' म्हणतो, त्यांनी नेहमीच अतुलनीय समर्पण आणि परिश्रम दर्शविले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा दर्जा टिकून आहे. असे संबोधित सर्वांचे आभार मानले.  आय,क्यु.ए.सी. समन्वयक  डाॅ. शशिकांत म्हाळूंकर यांनी पुढच्या सायकलसाठी देखील आम्ही सातत्याने प्रगती करत राहू असा विश्वास दर्शविला. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डाॅ. सुरेश भदरगे, डाॅ. निनाद जाधव, डाॅ. सुवर्णा रावळ, प्रबंधक नरेश शिरसाळे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डाॅ. कुलदीप राठोड यांनी मानले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच 'क्लायमॅट चेंज'...
डॉ.बाबा आमटे यांच्या आनंदवनाला ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित
मोठी बातमी : शरद पवारांचा अमित शाहांवर 'वार'.... देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार....
मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 
लाचखोरी : बल्लारशाह पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द ( ACB ) अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई 
AID ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग : आ किशोर जोरगेवार
चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद : आ.सुधीर मुनगंटीवार