लाडकी बहीण योजनेत आणखी सहा मोठे बदल जाणून घ्या...

लाडकी बहीण योजनेत आणखी सहा मोठे बदल जाणून घ्या...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ऑनड्युडी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरणही करण्यात आले आहे. याशिवाय, योजना लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले गेले आहेत, तर काही अटी व शर्ती शिथिल केल्या आहेत.

नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल, तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, हा या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय ठरला; तर ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. दरम्यान, या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तत्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

नवे नियम, अटी व शर्ती अशा आहेत.

1) लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.

2) एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला, तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे

3) ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून त्यात बदल करावा लागणार आहे.

4) केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.

5) नवविवाहितांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल, तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा समजावा.

6) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.16 जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असून बळीराजाला सुखी करण्याचा संकल्प करण्यात आला...
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या ऑटोचालकांसाठी आकर्षक स्थानक..!