संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : राज्यात सर्वत्र गाजलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला असून पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपालांकडे पाठीवला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणी करिता विरोधकांनी चांगलेच रान उठविले होते. या पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला असून पुढील कारवाईसाठी राज्याचे राज्यपाल यांच्याकडे पाठवीला आहे. असे प्रसार माध्यमांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List